Join us

mumbai: मेकअप आर्टिस्टचा सापडला संशयास्पद स्थितीतील मृतदेह, नातेवाईकांचा गंभीर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 16:46 IST

Mumbai Make Up artist Death: सिनेजगताशी संबंधित एका मेकअप आर्टिस्टचा संशयास्पद स्थितीतील मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईतील राहत्या घरी या मेकअप आर्टिस्टचा मृतदेह सापडला आहे.

सिनेजगताशी संबंधित एका मेकअप आर्टिस्टचा संशयास्पद स्थितीतील मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईतील राहत्या घरी या मेकअप आर्टिस्टचा मृतदेह सापडला आहे. सारा यंथन असं, या मृत्यू झालेल्या २६ वर्षीय मेकअप आर्टिस्टचं नाव आहे. सारा ही मुंबईतील खारदांडा परिसरात एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होती. तिथेच तिचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत सापडला. मात्र तिच्या शरीरावर जखमा असल्याने तिचा घातपात झाला, असावा अशी शंका कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.

सारा यंथन ही रविवारी सकाळपासूनच कुणाच्याही फोनला रिप्लाय देत नव्हती. दरम्यान, तिचं घरभाडं थकलेलं असल्याने त्याची वसुली करण्यासाठी इस्टेट एजंट तिच्या घरी गेला. तेव्हाही काहीच प्रतिसाद न मिळाल्याने त्याने याबाबतची माहिती पोलिसांना दिली होती. पोलिसांनी घटनास्थळी येत फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा सारा मृतावस्थेत सापडली. तिचा मृतदेह खोलीतील पंख्याला लटकलेला होता तसेच तिच्या शरीरावर जखमाही होत्या.

सारा यंथन ही मूळची नागालँडमधील रहिवासी आहे. ती सिनेमा, टीव्ही आणि वेबसिरीजसाठी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत असे. तिचे बँकेत काम करणाऱ्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेत तो लग्नासाठी तिच्याकडे तगादा लावत होता, असा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान, पोलिसांनी साराच्या आईला नागालँडमधून बोलावूवन घेतले असून, शवविच्छेदन करून मृतदेह तिच्या ताब्यात दिला आहे.  

टॅग्स :मुंबईमृत्यूगुन्हेगारी