मुंबई बॉम्बस्फोट: ९ वर्षे जगण्यासाठी झुंजला पराग सावंत, कुटुंबियांना आजही दु:ख

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 10:24 IST2025-07-22T10:23:39+5:302025-07-22T10:24:45+5:30

११ जुलैला झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात मिरा रोड आणि भाईंदरदरम्यान झालेल्या स्फोटात पराग सावंत यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली होती.

Mumbai blasts: Parag Sawant fought for life for 9 years, family still grieving | मुंबई बॉम्बस्फोट: ९ वर्षे जगण्यासाठी झुंजला पराग सावंत, कुटुंबियांना आजही दु:ख

मुंबई बॉम्बस्फोट: ९ वर्षे जगण्यासाठी झुंजला पराग सावंत, कुटुंबियांना आजही दु:ख

मुंबई : ११ जुलैला झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात मिरा रोड आणि भाईंदरदरम्यान झालेल्या स्फोटात पराग सावंत यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर तत्काळ दुसऱ्या दिवशी सावंत यांच्यावर माहीम येथील हिंदुजा रुग्णालयात मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली. काही वर्षे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. नऊ वर्षांनंतर त्यांचे निधन झाले. पराग हे एका खासगी बिल्डरच्या कार्यालयात काम करत होते. भाईंदर येथील घोडदेव नाका भागात ते राहत होते. ११ जुलैला अंधेरी ऑफिसहून लोकलने घरी परतत असताना स्फोट झाला. 

त्यांच्या मागे त्यावेळी त्यांची पत्नी प्रीती, आई माधुरी, बॉम्बे हाय येथे तेल उत्खनन प्रकल्पात काम करणारा लहान भाऊ प्रतीक आणि माझगाव डॉकमध्ये वेल्डर म्हणून काम करणारे वडील जयप्रकाश असे कुटुंब होते. पराग यांच्यावर मेंदूच्या दुखापतीमुळे वरिष्ठ न्यूरोसर्जन डॉ. बी. के. मिश्रा यांनी काही शस्त्रक्रिया केल्या होत्या. त्यानंतर त्यांच्यावर फिजिओथेरपी आणि अन्य उपचार करण्यात आले होते.

आम्ही आमचे कर्तव्य पार पाडले; खूप काही शिकलो
‘मि. चौधरी, आम्ही न्यायमूर्ती म्हणून आमचे कर्तव्य पार पाडले आहे. ही आमच्यावर सोपविलेली जबाबदारी होती,’ असे न्या. अनिल किलोर यांनी म्हटले, तर विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी आपल्याला भरपूर संधी दिल्याबद्दल न्यायालयाचे आभार मानले. ‘आम्ही खूप काही शिकलो. हा निकाल मैलाचा दगड ठरेल. सर्वांसाठी मार्गदर्शक असेल,’ असे ठाकरे यांनी म्हटले.

Web Title: Mumbai blasts: Parag Sawant fought for life for 9 years, family still grieving

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.