Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 10:54 IST2025-06-24T10:52:14+5:302025-06-24T10:54:33+5:30

Mumbai Bhandup West Wall Collapse: मुंबईतील भांडुप पश्चिम येथील पंजाबी चाळीत आज भिंत कोसळून झालेल्या घटनेत तीन जण जखमी झाले.

Mumbai: Bhandup West wall collapse, Three people were injured | Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी

Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी

मुंबईतीलभांडुप पश्चिम येथील पंजाबी चाळीत आज सकाळी भिंत कोसळली. या घटनेत एका वृद्ध महिलेसह एकूण तीन जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ७.०० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल (एमएफबी), स्थानिक पोलिस आणि बीएमसी वॉर्ड कर्मचाऱ्यांसह आपत्कालीन सेवा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. या घटनेत दोन चिमुकल्यांसह एक वृद्ध महिला जखमी झाली.  जखमींची ओळख पटली असून वनिता विश्वास सावंत (वय, ६५), योगेश मशीर पाल (वय, ५) आणि मनीषा मशीर पाल ( वय, ९) अशी त्यांची नावे आहेत.  त्यांच्यावर एमटी अग्रवाल रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. 

Web Title: Mumbai: Bhandup West wall collapse, Three people were injured