Join us

Mumbai: भांडूप प्रकरणात धक्कादायक माहिती उघड, 'त्या' मुलीने आत्महत्या केली नाही तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 10:21 IST

Mumbai Bhandup Suicide Case: मुंबईतील भांडूपमध्ये एका बहुमजली इमारतीच्या ३०व्या मजल्यावरून उडी घेत एका १५ वर्षीय मुलीने आत्महत्या करून स्वत:चे आयुष्य संपवल्याचे सांगण्यात आले. परंतु...

मुंबईतील भांडूपमध्ये एका बहुमजली इमारतीच्या ३०व्या मजल्यावरून उडी घेत एका १५ वर्षीय मुलीने आत्महत्या करून स्वत:चे आयुष्य संपवल्याचे सांगण्यात आले. परंतु, मृत मुलीच्या कुटुंबियांनी वेगळाच संशय व्यक्त करत मुलीने आत्महत्या केली नसल्याचा दावा केला. याप्रकरणी भांडुप पोलिसांनी अधिक चौकशी केली असता धक्कादायक माहिती उघड झाली. मृत मुलीच्या मित्राने तिला इमारतीच्या खाली ढकलून दिल्याने तिचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलीस चौकशीदरम्यान समोर आली. 

मृत मुलगी  तिच्या आईसोबत मुलुंडमध्ये राहत असून एका आंतरराष्ट्रीय शाळेत शिकत होती. शाळेत सतत कमी गुण मिळत असल्याने तिच्या मानसिक आरोग्यावर लक्षणीय परिणाम झाला. मृत्युच्या आदल्या दिवशी शाळेने तिच्या आईल तुमची मुलगी अनुतीर्ण झाली आणि तिला पुन्हा नववीचा अभ्यास करावा लागेल, असा इमेल पाठवला. त्यामुळे ती नैराश्यात गेली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी २४ जून रोजी संध्याकाळी ६ वाजता भांडुप पश्चिममधील एलबीएस रोड येथील महिंद्रा स्प्लेंडर सोसायटीत तिच्या १६ वर्षीय मित्राला भेटण्यासाठी गेली. तिथे गेल्यानंतर तिने आपल्या मित्राला शाळेने पाठवलेल्या इमेलबद्दल सांगितले. त्यानंतर मित्र तिला इमारतीच्या छतावर घेऊन गेला. छतावर असताना मित्राने तिची समजूत काढून तिचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला. या भावनिक संवादादरम्यानच मुलीने त्याला प्रपोज केले.  पण हे तिच्या मित्राला आवडले नाही आणि तो पायऱ्या उतरू लागला. मुलगी देखील त्याच्या मागे धावत गेली. इमारतीच्या ३०व्या मजल्यावरून मुलीने त्याला मिठी मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने मुलीला स्वत:पासून दूर ढकलले, ज्यामुळे तिचा तोल गेला आणि जवळच्या खिडकीतून खाली पडली. 

सुरुवातीला पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली. परंतु, पोलिसांनी संबंधित मुलाची, त्याच्या पालकांची, इमारतीच्या सुरक्षा रक्षकाची, रहिवाशांची, मुलांचे मित्रांची आणि मृत मुलीच्या आईची कसून चौकशी केली असता हा प्रकार समोर आला. 

टॅग्स :भांडुप पश्चिममहाराष्ट्रमुंबईगुन्हेगारी