मुंबई २० च्या खालीच; आणखी ५ दिवस गारठा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 10:12 IST2025-11-12T10:11:13+5:302025-11-12T10:12:17+5:30
Mumbai News: नाशिक, अहिल्यानगर, सांगली, सोलापूरसह संपूर्ण विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशमधील २६ जिल्ह्यांत पुढील पाच दिवस म्हणजे १५ नोव्हेंबरपर्यंत थंडीचा कडाका जाणवेल असा अंदाज आहे, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.

मुंबई २० च्या खालीच; आणखी ५ दिवस गारठा
मुंबई - नाशिक, अहिल्यानगर, सांगली, सोलापूरसह संपूर्ण विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशमधील २६ जिल्ह्यांत पुढील पाच दिवस म्हणजे १५ नोव्हेंबरपर्यंत थंडीचा कडाका जाणवेल असा अंदाज आहे, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
जळगांवला मंगळवारी पहाटे पाच वाजता ९.२ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविले असून, सरासरीपेक्षा ६.७ इतक्या अंशांने ते खालावून तेथे व लगतच्या परिसरात थंडीची तीव्र लाट अनुभवली गेली. जळगांवचे कमाल तापमानही २९.७ अंश इतके नोंदवून सरासरीच्या ३.७ अंशांनी हे तापमान खालावलेले आहे. त्यामुळे तेथे व लगतच्या परिसरात हुडहुडी जाणवली. महाराष्ट्रातील डहाणू, नाशिक, मालेगाव अहिल्यानगर, जेऊर, बीड, नांदेड शहरांबरोबरच संपूर्ण विदर्भातील शहरात व लगतच्या परिसरात थंडीच्या लाटेसदृश्य स्थिती अनुभवली गेली. मंगळवारी मुंबईचे किमान तापमान १९ अंश नोंदवण्यात आले असून, मुंबईत रात्रीच्या हवेतील गारवा टिकून आहे. शुक्रवारपर्यंत हवेतील गारवा कायम राहील आणि त्यानंतर मात्र तापमानात किंचित वाढ नोंदविली जाईल.