धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 20:29 IST2025-06-06T20:28:05+5:302025-06-06T20:29:29+5:30

Crime: एलटीटी- नांदेड एक्सप्रेसमधून प्रवास करताना दरोडेखोराशी झटापट झालेल्या झटापटीत मुंबईतील एका डॉक्टरने हात गमावला.

Mumbai- Based Doctor Loses Arm While Saving Wife During Robbery on Moving Train | धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!

धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!

एलटीटी- नांदेड एक्सप्रेसमधून प्रवास करताना दरोडेखोराशी झटापट झालेल्या झटापटीत मुंबईतील एका डॉक्टरने हात गमावला. ही घटना ४ जून रोजी पहाटे सुमारे ३:५० वाजताच्या सुमारास घडली.  याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे ट्रेनने प्रवास करणाऱ्या लोकांमध्ये घबराट पसरली आहे.

योगेश देशमुख असे पीडित व्यक्तीचे नाव आहे. योगेश हे त्यांची पत्नी दिपाली यांच्यासोबत मुंबईहून नांदेडला जात होते. देशमुख दाम्पत्य त्यांच्या मुलीसोबत कोच एस ४च्या २, ३ आणि ५ क्रमांकाच्या सीटवरून प्रवास करत होते. प्रवासादरम्यान, ट्रेनचा वेग कमी झाल्यानंतर एका अज्ञात व्यक्तीने डब्यात चढून दिपाली यांची पर्स हिसकावली. पत्नीची पर्स वाचवताना योगेश आणि दरोडेखोर यांच्यात झटापट झाली. त्यावेळी दरोडेखोराकडून पर्स हिसकावून घेताना योगेश यांचा तोल गेला आणि ते ट्रेनखाली पडले. या घटनेत योगेश यांनी आपला हात गमावला. त्यानंतर त्यांना ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले.

कोणत्याही सुरक्षा कर्मचारी कोचमध्ये उपस्थित नव्हते, तसेच आरपीएफ किंवा जीआरपीचे जवान स्टेशन परिसरात किंवा ट्रॅकवर गस्त घालत नव्हते, अशी माहिती आहे. कुर्ला रेल्वे पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३०९ (४) आणि (५) अंतर्गत गुन्हा दाखल  करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Mumbai- Based Doctor Loses Arm While Saving Wife During Robbery on Moving Train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.