Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 21:43 IST

Ajit Pawar NCP Releases First List of 37 Candidates for BMC: राज्यात आगामी महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, मुंबई महापालिकेत आपली ताकद दाखवण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे.

राज्यात आगामी महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, मुंबई महापालिकेत आपली ताकद दाखवण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे. निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने आज ३७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.

मुंबईच्या विविध प्रभागांमध्ये सक्षम उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. या यादीमध्ये अनुभवी कार्यकर्त्यांसह नव्या चेहऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. विशेषतः अल्पसंख्याक बहुल वॉर्ड आणि पक्षाची पकड असलेल्या विभागांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे दिसून येत आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणूक: राष्ट्रवादी (अजित पवार) पहिली यादी:

१) मनिष दुबे (वॉर्ड क्र. ३) २) सिरील पिटर डिसोझा (वॉर्ड क्र. ४८)३) अहमद खान (वॉर्ड क्र. ६२),४) बबन रामचंद्र मदने (वॉर्ड क्र. ७६)५) सुभाष जनार्दन पाताडे (वॉर्ड क्र. ८६)६) सचिन तांबे (वॉर्ड क्र. ९३)७) श्रीम. आयेशा शाम्स खान ( वॉर्ड क्र. ९६)८) सज्जू मलिक (वॉर्ड क्र. १०९)९)शोभा रत्नाकर जाधव (वॉर्ड क्र. ११३)१०)हरिश्चंद्र बाबालिंग जंगम (वॉर्ड क्र. १२५)११) अक्षय मोहन पवार (वॉर्ड क्र. १३५)१२) ज्योती देविदास सदावर्ते (वॉर्ड क्र. १४०)१३) रचना रविंद्र गवस (वॉर्ड क्र. १४३)१४) भाग्यश्री राजेश केदारे (वॉर्ड क्र. १४६)१५) सोमू चंदू पवार (वॉर्ड क्र. १४८)१६) अब्दुल रशीद मलिक(वॉर्ड क्र. १६५)१७) चंदन धोंडीराम पाटेकर (वॉर्ड क्र. १६९)१८) दिशा अमित मोरे (वॉर्ड क्र. १७१)१९) सबिया अस्लम मर्चंट (वॉर्ड क्र. २२४)२०) विलास दगडू घुले (वॉर्ड क्र. ४०)२१) अजय विचारे (वॉर्ड क्र. ५७)२२) हदिया फैजल कुरेशी (वॉर्ड क्र. ६४)२३) ममता धर्मेद्र ठाकूर (वॉर्ड क्र. ७७)२४) युसूफ अबुबकर मेमन (वॉर्ड क्र. ९२)२५) अमित अंकुश पाटील (वॉर्ड क्र. ९५)२६) धनंजय पिसाळ (वॉर्ड क्र. १११)२७) प्रतिक्षा राजू घुगे (वॉर्ड क्र. १२६)२८) नागरत्न बनकर (वॉर्ड क्र. १३९)२९) चांदणी श्रीवास्तव (वॉर्ड क्र. १४२)३०)दिलीप हरिश्चंद्र पाटील (वॉर्ड क्र. १४४)३१) अंकिता संदीप द्रवे (वॉर्ड क्र. १४७)३२) लक्ष्मण गायकवाड (वॉर्ड क्र. १५२)३३) डॉ. सईदा खान (वॉर्ड क्र. १६८)३४) बुशरा परवीन मलिक (वॉर्ड क्र. १७०)३५) वासंथी मुरगेश देवेंद्र (वॉर्ड क्र. १७५)३६) किरण रविंद्र शिंदे (वॉर्ड क्र. २२२)३७) श्रीम. फरीन खान (वॉर्ड क्र. १९७)

महायुतीमध्ये सत्तेत असूनही, मुंबई महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी (अजित पवार गट) ३७ उमेदवारांची यादी जाहीर केल्याने पक्ष स्वबळावर किंवा जास्तीत जास्त जागा लढवण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai: Ajit Pawar's NCP roars, announces first list of 37 candidates!

Web Summary : Ajit Pawar's NCP prepares for Mumbai civic polls, releasing its first list of 37 candidates. The list prioritizes experienced workers and new faces, especially in minority-dominated wards, signaling a strong push for the upcoming elections.
टॅग्स :महानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक २०२६अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसराजकारण