Mumbai Airport: मुंबई विमानतळाला धमकीचा ईमेल, 'या' विमानांत स्फोटकं, दर अर्ध्या तासाला उडवून देणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 10:31 IST2025-12-11T10:31:04+5:302025-12-11T10:31:35+5:30
Mumbai Airport Bomb Threat News: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला धमकीचा ईमेल प्राप्त झाल्याने एकच खळबळ उडाली.

Mumbai Airport: मुंबई विमानतळाला धमकीचा ईमेल, 'या' विमानांत स्फोटकं, दर अर्ध्या तासाला उडवून देणार!
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला धमकीचा ईमेल प्राप्त झाल्याने एकच खळबळ उडाली. जपान, कॅनडा, जर्मनी आणि ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानांमध्ये स्फोटके ठेवण्यात आली असून ही विमाने उड्डाण केल्यानंतर दर अर्ध्या तासाने एकामागून एक उडवली जातील, अशी धमकी ईमेलच्या माध्यमातून देण्यात आली. या धोक्यापासून वाचण्यासाठी आणि स्फोटके निष्क्रिय करण्यासाठी धमकी देणाऱ्याने १० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची मागणी केली आहे. या ईमेलमुळे विमानतळ आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. याप्रकरणी मुंबई पोलीस अधिक तपास करीत आहेत.