मुंबई विमानतळ, इंडिगोला २ कोटी दंड, विमानतळावर प्रवाशांचे जेवण करणे भोवले 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 06:17 AM2024-01-19T06:17:19+5:302024-01-19T06:18:08+5:30

या प्रकरणाची दखल थेट नागरी विमान मंत्रालयाने घेत इंडिगो कंपनी व मुंबई विमानतळ प्रशासनाला कारणे दाखवा नोटीस दिली होती.

Mumbai Airport, IndiGo fined 2 crores, serving food to passengers at the airport | मुंबई विमानतळ, इंडिगोला २ कोटी दंड, विमानतळावर प्रवाशांचे जेवण करणे भोवले 

मुंबई विमानतळ, इंडिगोला २ कोटी दंड, विमानतळावर प्रवाशांचे जेवण करणे भोवले 

मुंबई : गेल्या रविवारी गोव्याहून दिल्लीला जाणारे विमान दिल्लीतील धुक्यामुळे मुंबई विमानतळावर वळवल्यानंतर विमान कंपनीतर्फे विमानतळावरच प्रवाशांना जेवण देणे इंडिगो कंपनीला चांगलेच भोवले असून, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) इंडिगो कंपनीला १ कोटी २० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे, याचसोबत झाल्या प्रकाराबद्दल मुंबई विमानतळालाही ९० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. 

या प्रकरणाची दखल थेट नागरी विमान मंत्रालयाने घेत इंडिगो कंपनी व मुंबई विमानतळ प्रशासनाला कारणे दाखवा नोटीस दिली होती. त्यानंतर ही दंडाची कारवाई केली आहे. 

आजी वारल्याचा मेसेज येताच उड्डाणाला नकार 
मुंबई : पाटणा येथून पुण्याला उड्डाण करण्यासाठी रन-वेवर दाखल झालेले विमान अचानक पुन्हा पार्किंगमध्ये दाखल झाले. विमानाला विलंब का होत आहे, असा प्रश्न प्रवाशांना पडण्याआधीच मुख्य वैमानिकाने आपल्या सहवैमानिकाच्या आजीचे नुकतेच निधन झाल्याची बातमी आली असून, त्यामुळे तो विमान उडविणार नसल्याची घोषणा केली. प्रवाशांनीही घटनेचे गांभीर्य दाखवत सहानुभूतीचे प्रदर्शन केले. - सविस्तर वृत्त/६

Web Title: Mumbai Airport, IndiGo fined 2 crores, serving food to passengers at the airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.