मुंबईतील मुलुंड पश्चिम परिसरात शनिवारी दुपारी दुर्दैवी घटना घडली. बांधकाम सुरू असलेल्या मेट्रोच्या पिलरचा काही भाग अचानक कोसळला आणि तो खालून जात असलेल्या रिक्षासह इतर काही वाहनांवर कोसळला. या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून, काही जण जखमी झाले आहेत.
मुंबईतील मुलुंड पश्चिम भागात आज (१४ फेब्रवारी) दुपारी एक भीषण दुर्घटना घडली. लाल बहादूर शास्त्री मार्गावर मेट्रोचे काम सुरू असताना सिमेंटच्या पिलरचा एक मोठा भाग अचानक कोसळला. हा राडारोडा थेट चालत्या रिक्षावर पडल्याने रिक्षाचा पूर्णपणे चक्काचूर झाला असून, यामध्ये ३ ते ४ प्रवासी जखमी झाले होते. त्यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी दुपारी १२ वाजून २० मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली. मुलुंडमधील जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीजवळ मेट्रो मार्गिकेचे बांधकाम सुरू आहे. यावेळी पिलरचा काही भाग निखळला आणि खालून जाणाऱ्या एका रिक्षावर कोसळला. या भीषण अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
बचावकार्य आणि यंत्रणांची धावपळ
घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल स्थानिक पोलीस आणि वॉर्ड कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत.
जखमींची अवस्था: रिक्षात अडकलेल्या ३ ते ४ प्रवाशांना तातडीने बाहेर काढून '१०८' रुग्णवाहिकेमार्फत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे.
यंत्रणा सज्ज: मेट्रोचे कर्मचारी आणि पोलीस प्रशासन घटनास्थळावरून ढिगारा हटवण्याचे काम करत असून पुढील तपास सुरू आहे.
वाहतुकीवर मोठा परिणाम
एलबीएस मार्ग हा अत्यंत वर्दळीचा रस्ता असल्याने या अपघातामुळे मुलुंड परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पोलिसांनी वाहनधारकांना या मार्गावरून प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.
Web Summary : A metro pillar slab collapsed in Mumbai's Mulund, injuring several people. The incident occurred near Johnson & Johnson company, crushing vehicles including a rickshaw. Rescue operations are underway, and the injured have been hospitalized. Traffic is severely affected on LBS Marg.
Web Summary : मुंबई के मुलुंड में एक मेट्रो पिलर का स्लैब गिरने से कई लोग घायल हो गए। घटना जॉनसन एंड जॉनसन कंपनी के पास हुई, जिसमें एक रिक्शा सहित कई वाहन दब गए। बचाव कार्य जारी है, और घायलों को अस्पताल में भर्ती कराया गया है। एलबीएस मार्ग पर यातायात गंभीर रूप से प्रभावित है।