Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 15:43 IST2025-04-29T15:41:10+5:302025-04-29T15:43:03+5:30
Mumbai Accident: मुंबईत ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्नात एका तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाला.

Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
दक्षिण मुंबईत सोमवारी (२८ एप्रिल २०२५) दुपारी ट्रकखाली चिरडून एका तरुणीचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे. ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्नात हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.
सोमवारी दुपारी दक्षिण मुंबईतील व्हीपी रोडवर एका दुचाकीने ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. परंतु, दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीस्वारने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे दुचाकी घसरली आणि दुचाकीवर बसलेल्या दोन्ही तरुणी खाली पडल्या. दुचाकीवर मागे बसलेली सिया उत्तम मेहता ट्रकखाली चिरडली गेली. तिला ताबडतोब जेजे रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या अपघातानंतर घटनास्थळावरून पळून गेलेल्या ट्रक चालकाला पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यातील अपघाताच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. वेगाने गाडी चालवणे किंवा ओव्हरटेक करणे अनेकांच्या जीवावर बेतले आहे. दररोज अशी अनेक प्रकरणे समोर येत आहे. अपघाताच्या घटनेतील मृतांमध्ये सर्वाधिक तरुण आहेत.