Join us

Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 14:36 IST

Mumbai Rape And Murder: मालवणी पोलीस ठाण्यात हद्दीत ही धक्कादायक घडली.

मुंबईत एका ३० वर्षीय महिलेला आणि तिच्या १९ वर्षीय प्रियकराला अडीच वर्षांच्या मुलीची हत्या आणि बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. मालवणी पोलीस ठाण्यात हद्दीत ही धक्कादायक घडली. रात्री उशिरा मालवणी जनकल्याण नगर येथील सरकारी रुग्णालयात मुलीला उपचारासाठी आणले तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले.

ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांनी चिमुकलीची तपासणी केली आणि तपासणीदरम्यान तिला मृत घोषित केले. तपासादरम्यान मुलीच्या गुप्तांगावर जखमा आढळल्या आणि त्यांनी ताबडतोब पोलिसांना कळवले. वैद्यकीय अहवालानुसार, मालवणी पोलिसांनी संबंधित महिलेला आणि तिच्या प्रियकराविरोधात भारतीय न्याय संहिताच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला.

वैद्यकीय अहवालात धक्कादायक माहिती समोरमिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिला घटस्फोटीत असून ती गर्भवती असताना तिचा पती तिला सोडून गेल्याची माहिती आहे. अडीच वर्षांपूर्वी तिने एका मुलीला जन्म दिला. आरोपी मुलाशी प्रेमसंबंध निर्माण झाल्यापासून ती तिच्या आईच्या घरी राहत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने काल रात्री आईसमोरच चिमुकलीवर बलात्कार केला. चिमुकली वेदना जाणवू लागल्याने तिला मालवणी जनकल्याण नगर येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. आरोपी महिलेने सुरुवातीला रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची दिशाभूल केली. परंतु, वैद्यकीय अहवालात चिमुकलीवर बलात्कार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. 

पोलिसांचे स्पष्टीकरण"वैद्यकीय अहवालाच्या आधारे, आम्ही भारतीय न्याय संहिता आणि पोस्को कायद्याच्या संबंधित कलमांखाली आरोपी आई आणि तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे", अशी माहिती मालवणी पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने दिली.

टॅग्स :मुंबईमहाराष्ट्रगुन्हेगारी