मुंबईच्या घाटकोपरच्या परिसरात एका २८ वर्षीय तरुणाचा नाल्यात अडकून मृत्यू झाला. रविवारी (१९ मे २०२५) दुपारच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. मयत व्यक्तीने नाल्यात अडकलेल्या एका आठ वर्षाच्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात स्वत:चा जीव गमावला, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
शहजाद शेख असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारच्या सुमारास एक मुलगी नाल्यातून चेंडू काढताना गाळात अडकली. तिला वाचवण्यासाठी शहजाद शेखने नाल्यात उडी घेतली. त्याने मुलीला नाल्यातून बाहेर काढले. परंतु, तो स्वत:च गाळात अडकला. पोलीस आणि अग्निशमन विभागाच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आला. त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. पंरतु, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली.