Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 14:38 IST2025-11-14T14:35:47+5:302025-11-14T14:38:45+5:30

Mumbai Malad Crime: मुंबईतील मालाड परिसरात एका १९ वर्षीय तरुणासोबत धक्कादायक घटना घडली.

Mumbai: 19-Year-Old Student Alleges Sexual Abuse, Forced Surgery and Extortion By Transgender Gang In Malad | Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!

Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!

मालाड येथील एका १९ वर्षीय बीकॉमच्या विद्यार्थ्यासोबत अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकार घडल्याचे उघडकीस आले. एका ट्रान्सजेंडर टोळीने या तरुणाला जबरदस्ती आणि ब्लॅकमेलिंग करून लिंग बदल शस्त्रक्रिया करायला लावली आणि त्याच्याकडून लाखो रुपयांची खंडणी उकळली, असा आरोप पीडित तरुणाने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक करून पुढील तपास सुरू केला. 

मिड-डेने दिलेल्या वृत्तानुसार, मालाड पूर्वेतील कुरार गावातील अप्पापाडा येथील रहिवासी असलेल्या पीडित विद्यार्थ्याची दीड वर्षांपूर्वी मालाड पश्चिमेतील कावेरी (कार्तिक) वेदमणी निकम नावाच्या व्यक्तीशी मैत्री झाली. कावेरीच्या माध्यमातून त्याची ओळख नेहा खान उर्फ ​​नेहा इप्टेशी झाली, जी स्थानिक ट्रान्सजेंडर गटाचे नेतृत्व करते. दरम्यान, ५ ऑगस्ट रोजी पीडित तरुणाला नेहाच्या घरी बोलावण्यात आले, तिथे कावेरी आणि नेहा यांनी त्याचे लिंग बदलण्यासाठी ब्रेनवॉश केले. पीडित तरुणाने नकार दिल्यावर त्याला एका खोलीत बंद केले गेले. त्याला कुत्र्यासोबत अश्लील कृत्य करण्यास भाग पाडले. हे कृत्य रेकॉर्ड करून पीडित तरुणाला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात झाली.

साडी नेसवून भीक मागण्यास भाग पाडले

त्यानंतर व्हिडिओ लीक करण्याची आणि खोट्या गुन्हेगारी प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन नेहा आणि कावेरीने ५१,००० रुपयांची मागणी केली. मुलाच्या सुरक्षिततेसाठी त्याच्या आईने गुगल पेद्वारे नेहाच्या खात्यात १०,००० रुपये ट्रान्सफर केले. नंतर व्हिडिओच्या धमकीने नेहाने अतिरिक्त ४०,००० रुपये मागितले. एवढेच नव्हे तर, या टोळीने पीडिताला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. सार्वजनिक ठिकाणी साडी नेसवून भीक मागायला लावली आणि मारहाण केली. 

जबरदस्तीने द्यकीय कागदपत्रांवर स्वाक्षरी

२८ ऑक्टोबर रोजी नेहा, तिचा पती सोहेल खान, दत्तक मुलगा भास्कर शेट्टी आणि इतरांनी पीडिताला गुजरातमधील सुरत येथील रिपल मॉलजवळच्या एका रुग्णालयात नेले. दबावाखाली तरुणाला वैद्यकीय कागदपत्रांवर स्वाक्षरी करायला लावल्या आणि डॉक्टरांनी त्याच्या संमतीशिवाय जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया केली, असा आरोप आहे. शस्त्रक्रियेनंतर मुंबईला परतल्यावर नेहाने त्याला 'बरे करण्याच्या बहाण्याने' त्याच्या शस्त्रक्रियेच्या जागेवर गरम पाणी ओतले आणि त्याला घरातील कामे करण्यास भाग पाडले. जेव्हा पीडितेने आपल्या आईकडे परत जाण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा नेहाने 'शस्त्रक्रियेचा खर्च' म्हणून ४.५ लाख रुपये परत मागितले.

पुन्हा अपहरण करण्याचा प्रयत्न

४ नोव्हेंबर रोजी, पीडित नेहाच्या घरातून पळून जाण्यात यशस्वी झाला आणि त्याने आपल्या आईची भेट घेतली. मात्र, त्याच रात्री उशिरा नेहा आणि तिच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या घरी हल्ला करून पीडितेच्या आईला धमकावले. ५ नोव्हेंबर रोजी पीडित तरुण अप्पापाडा ऑटोरिक्षा स्टँडवर असताना कावेरी, तिचा प्रियकर जितू आणि कृष्णा यादव यांनी त्याचे पुन्हा अपहरण केले. स्थानिक रहिवासी प्रवीण खडतले यांनी हस्तक्षेप केल्यानंतर नेहाने त्याला मालाड रेल्वे स्टेशनजवळ सोडले.

पोलीस तपास सुरू

पीडित तरुणाने कुरार पोलीस ठाण्यात औपचारिक तक्रार दाखल केली. हे प्रकरण मालवणी पोलिसांच्या हद्दीत घडल्याने तिथे वर्ग करण्यात आले. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी नेहा खान तिचा पती सोहेल खान, भास्कर शेट्टी, कावेरी निकम, माही, नवाज, कृष्णा यादव आणि इतरांवर गुन्हेगारी कट, अपहरण, लैंगिक अत्याचार, खंडणी आणि जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया केल्याबद्दल संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला.  डीसीपी झोन ​​इलेव्हन यांच्या मार्गदर्शनाखाली एसीपी नीता पाडवी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक मीना मारे यांच्या पथकाने चार आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Web Title : मुंबई: छात्र की जबरन लिंग परिवर्तन सर्जरी; ट्रांसजेंडर गिरोह द्वारा उगाही।

Web Summary : मुंबई में एक छात्र को कथित तौर पर एक ट्रांसजेंडर गिरोह ने लिंग परिवर्तन सर्जरी के लिए मजबूर किया, जिसने उसे ब्लैकमेल किया और उगाही की। शिकायत दर्ज होने के बाद पुलिस ने चार संदिग्धों को गिरफ्तार किया, जिसमें शारीरिक हमला और वित्तीय मांगें शामिल हैं।

Web Title : Mumbai: Student forced into gender change surgery; Transgender gang extorts.

Web Summary : A Mumbai student was allegedly forced into gender reassignment surgery by a transgender gang who blackmailed and extorted him. Police arrested four suspects after the victim filed a complaint detailing the ordeal, including physical assault and financial demands.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.