गोरेगाव पूर्व येथील नेस्को कंपाऊंडमध्ये नवरात्र दांडिया कार्यक्रमात एका जमावाकडून १९ वर्षीय तरुणाला मारहाण करण्यात आली. या घटनेत संबंधित तरुण जखमी झाला. याप्रकरणी पोलिसांनी ३ जणांना ताब्यात घेतले. परंतु, त्यांना पोलीस ठाण्यात नेले जात असताना ते पोलीस व्हॅनमधून पळून गेले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून मुंबईतीलनवरात्री स्थळांवर गर्दी व्यवस्थापन आणि सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. ही घटना बुधवारी (२६ सप्टेंबर २०२५) रोजी घडली.
जेनिल बरबाया (वय, १९) असे पीडित तरुणाचे नाव आहे. जेनिल हा काल गोरेगाव येथील नेस्को कंपाऊंडमध्ये नवरात्र दांडिया कार्यक्रमात गेला असता तीन जणांनी त्याला मारहाण केली. या घटनेत जखमी झालेल्या जेनिलला मालाड पश्चिमेकडील तुंगा रुग्णालयातील आयसीयू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले.
नेमके काय घडले?
जेनियाच्या वडिलांनी सांगितले की, दांडिया कार्यक्रमादरम्यान एका तरुणाचा जेनिलला धक्का लागला. त्यामुळे त्यांच्यात वाद सुरू झाला आणि संबंधित तरुणासह त्याच्या दोन मित्रांनी जेनिलला मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
व्हिडीओ व्हायरल
मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पीडित तरुणाच्या नाकातून रक्तस्त्राव होत असल्याचे दिसून आले. हाणामारीनंतर पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले. परंतु, काही वेळातच ते पोलीस व्हॅनमधून पळून गेले. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
Web Summary : A 19-year-old was beaten at a Goregaon Navratri Dandiya event. Police arrested three, who then escaped. The victim is hospitalized, and the incident raises security concerns.
Web Summary : गोरेगांव में नवरात्रि डांडिया कार्यक्रम में 19 वर्षीय युवक की पिटाई की गई। पुलिस ने तीन लोगों को गिरफ्तार किया, जो बाद में भाग गए। पीड़ित अस्पताल में भर्ती, सुरक्षा पर सवाल।