कोरोनानं वडिलांचं छत्र गमावलेल्या ११ वर्षीय मुलीवर आईसोबत मासे विकण्याची वेळ! 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 04:34 PM2021-07-02T16:34:18+5:302021-07-02T16:35:46+5:30

मुंबईतल्या धारावीतील एका चिमुकल्या मुलीची कहाणी मनाला चटका लावून जाणारी आहे. 

Mumbai 11 year old joins mom to sell fish after dad died of covid | कोरोनानं वडिलांचं छत्र गमावलेल्या ११ वर्षीय मुलीवर आईसोबत मासे विकण्याची वेळ! 

कोरोनानं वडिलांचं छत्र गमावलेल्या ११ वर्षीय मुलीवर आईसोबत मासे विकण्याची वेळ! 

Next

कोरोनानं संपूर्ण जगात उलथापालथ केलीय. अनेकांच्या हसत्याखेळत्या आयुष्याला ब्रेक लागला तर कुणाच्या इवल्याशा खांद्यावर घरचा कर्ता माणूस गमावल्यानं जबाबदारीचं ओझं आलं. अनेक लहान मुलांनी आपले पालक गमावलेत. त्यामुळे त्यांच्या डोक्यावरचं छत्र हरपलं आहे. मुंबईतल्या धारावीतील अशाच एका चिमुकल्या मुलीची कहाणी मनाला चटका लावून जाणारी आहे. (Mumbai 11 year old joins mom to sell fish after dad died of covid)

धारावीच्या गल्लीबोळात एका छोट्याशा घरात राहणाऱ्या ११ वर्षीय वैभवी खरटमोल ही कोरोना महामारीनं धडक देण्याआधी खूप आनंदात अन् हसतखेळत जगत होती. पण कोरोनाच्या पहिल्या लाटेत तिनं वडील गमावले आणि आता या चिमुकलंची संपूर्ण आयुष्यच बदलून गेलंय. काही न कळणाऱ्या वयातच तिला आता आपल्या आईला मासे विक्रीच्या व्यवसायात मदत करण्याची आणि तिच्यासोबत बाजारात जाऊन मासे विक्री करण्याची वेळ आली आहे. 

कोरोनाचं घरचं दार ठोठावण्याआधी वैभवीचे वडीलचं तिचं सारं जग होते. ते तिचे सर्व लाड पुरवायचे. ते स्वत: मासे विक्रीचा व्यवसाय करत होते आणि पत्नी घर सांभाळत होती. पण वैभवीच्या वडीलांचं कोरोनानं  निधन झालं आणि आता तिच्या आईवर वडिलांचा व्यवसाय करण्याची वेळ आली आहे. घरात दोन वेळचं जेवण व्हावं आणि मुलीचं संगोपन व्हावं यासाठी आईनं मासे विक्रीचा व्यवसाय सुरू ठेवायचं ठरवलं. आता डॅडी नाहीत म्हणून आईवर मासे विक्रीची वेळ आलीय आणि तिला घर सांभाळून मासळी बाजारात जाऊन व्यवसाय देखील करावा लागतोय हे पाहून ११ वर्षीय वैभवीनंही आईला मजत करायची ठरवलं. आईसोबत तीही मासळी बाजारात आवाज देत मासे विक्रीचा व्यवसाय करतेय. 

कोरोनाच्या प्रादुर्भावानं शाळा बंद असल्या तरी आता ऑनलाइन शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे सकाळी ८ ते साडेदहा वाजेपर्यंत वैभवी मासळी बाजारात आईला मदत करते. त्यानंतर ती ऑनलाइन शाळेत उपस्थिती लावते. घरी स्मार्टफोन नसल्यानं शेजारील रहिवासी तिला शाळेची वेळ असते तोवर तिला स्मार्टफोनची मदत करतात. वैभवी हे एक फक्त उदाहरण आहे. आज राज्यात कोरोनानं डोक्यावरचं छत्र गमावलेली अनेक चिमुकली मुलं आहेत. त्यांच्या भवितव्याचा मोठा प्रश्न उभा झाला आहे.   

Read in English

Web Title: Mumbai 11 year old joins mom to sell fish after dad died of covid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.