Join us

मुकेश अंबानी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी, अनंत-राधिकाच्या लग्नाचे दिले निमंत्रण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 09:42 IST

मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये १२ जुलैला होणार विवाह

Mukesh Ambani at CM Eknath Shinde, Marriage Invitation: रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला वर्षा निवासस्थानी पोहोचले. निमित्त होते, लग्नाच्या निमंत्रणाचे. मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा याचा विवाह १२ जुलै रोजी मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील प्रतिष्ठित जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार आहे. त्या निमित्ताने मुकेश अंबानी, नवरदेव अनंत अंबानी, उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी वधू राधिका मर्चंट यांनी एकत्रित जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लग्नासाठी आमंत्रण केले.

बीकेसी येथे हा विवाहसोहळा थाटामाटात संपन्न होणार आहे. याआधी सोमवारी रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांनी काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतले आणि भगवान शंकराला लग्नाचे पहिले निमंत्रण दिले. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नासाठी मुंबईत एका भव्य सोहळ्याचे आयोजन केले जाणार आहे. हा सोहळा म्हणजे परंपरा आणि आधुनिकतेचा मिलाफ असेल असे सांगितले जात आहे.

पारंपारिक हिंदू वैदिक रितीरिवाजानुसार विवाह सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी १२ जुलै रोजी लग्नसोहळा होणार आहे. त्या दिवशी सर्व निमंत्रितांना पारंपारिक भारतीय पोशाखात येण्याचे निमंत्रण आहे, शनिवारी, १३ जुलै रोजीही उत्सव सुरुच राहणार आहे. तर रविवारी १४ जुलै रोजी या नियोजित सोहळ्याची सांगता होणार आहे. या भव्य सोहळ्यासाठी पाहुण्यांना 'भारतातील विविधता' दर्शवणारा ड्रेस कोड असणार आहे, असे सांगितले जात आहेत.

टॅग्स :मुकेश अंबानीअनंत अंबानीएकनाथ शिंदेलग्नमुख्यमंत्री