मोहमद रफी यांचा शंभरावा वाढदिवस पुढच्यावर्षी दिल्लीत साजरा करू; केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची घोषणा

By मनोहर कुंभेजकर | Published: December 25, 2023 12:44 PM2023-12-25T12:44:55+5:302023-12-25T12:45:09+5:30

17 व्या मोहम्मद रफी पुरस्काराचे शानदार वितरण

Muhammad Rafi's 100th birthday will be celebrated in Delhi next year; Announcement by Union Minister Piyush Goyal | मोहमद रफी यांचा शंभरावा वाढदिवस पुढच्यावर्षी दिल्लीत साजरा करू; केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची घोषणा

मोहमद रफी यांचा शंभरावा वाढदिवस पुढच्यावर्षी दिल्लीत साजरा करू; केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची घोषणा

मुंबई : मोहम्मद रफी यांचे 2024 हे जन्मशताब्दी वर्ष असून वर्षभरात प्रत्येक महिन्यातील 24 तारखेला देशभर त्यांच्या गाण्याचे कार्यक्रम आयोजित करता येतील असा प्रयत्न करु या, असे आवाहन कलावंताना करतानाच केंद्रीय रेल्वे आणि वाणिज्य मंत्री पियुष  गोयल यांनी पुढच्या वर्षी 24 डिसेंबर 2024 ला दिल्लीत जिथे जी 20 परिषद झाली त्या भारत मंडपम च्या प्रांगणात रफी साहेबांचा 100 वाढदिवस शानदार साजरा करु, अशी घोषणा पियुष गोयल यांनी केली.

मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांच्या स्पंदन आर्ट या संस्थेतर्फे मोहम्मद रफी यांच्या वाढदिवसादिवशी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी एका संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंताला जीवन गौरव व  मोहम्मद रफी पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. पुरस्काराचे हे 17 वे वर्ष असून एक लाख रू धनादेश, स्मृतीचिन्ह आणि शाल श्रीफळ असे जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप असून, ५१ हजार रू. रोख आणि मानचिन्ह असे रफी पुरस्काराचे स्वरूप आहे. 

सत्तरीच्या दशकात आपल्या गीतांनी प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या गीतकार संतोष आनंद यांना यावर्षीचा मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्कार तर  तीन दशकांच्या कारकिर्दीत हिंदीसह अनेक भाषांमध्ये ५ हजारांहून अधिक गाण्यांना आवाज देणाऱ्या ख्यातनाम गायक सोनू निगम यांना मोहम्मद रफी पुरस्कार २०२३ काल संध्याकाळी रंगशारदा येथे झालेल्या शानदार सोहळ्यात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत वितरित करण्यात आले.

यावेळी प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर, मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार, अँड प्रतिमा शेलार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पुरस्कार स्विकारल्यानंतर 85 वर्षांचे  गीतकार संतोष आनंद आपल्या भावना व्यक्त करताना भाऊक झाले. संगीतकार लक्ष्मिकांत यांचे निधन झाल्याने मुंबई सोडली, असे सांगताना त्यांना गहिवरून आले. तर एक काळ असा होता की, समय को हम काटते थे आज समय हमको काट रहा है... एकाच जीवनाने सुख आणि दर्द दिले. पण आम्ही दु:खाला घाबरणार नाही, आज खूप वर्षांनी श्रोत्यांना भोटलो आणि पुन्हा तरुण झालो, अशा शब्दांत त्यांनी आपल्या सध्याच्या जगण्याचे कंगोरे उलघडले. 

 गायक सोनू निगम कृतज्ञता व्यक्त करताना म्हणाले की, रफी साहेब मला गुरु पेक्षा जास्तही प्रिय आहेत. माझ्या वडिलांकडून संगीताचा वारसा मला मिळाला, त्यांनी सांगितले की, गुरुच्या गाण्यात गुरुने घेतलेल्या हरकतीपेक्षा जास्त हरकती घेऊ नको, हे मी आयुष्यभर तंतोतंत पाळत आलो. पुरस्कार स्विकारल्यानंतर त्यांनी प्रेक्षकांच्या फर्माईशवरुन सादर केलेल्या गाण्यानी उपस्थितांची मने जिंकली.

यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी रफी साहेबांनी गायलेले रामजी की निकली सवारी.. या गाण्याची आठवण करुन देत हा योगायोग आहे की, रफी साहेबांच्या जन्मशताब्दी वर्षात खरंच देशभर प्रभू रामाची भव्य यात्रा निघावी. रफी साहेब हे असे गायक होते की, त्यांनी मानवाच्या प्रत्येक भाव भावनांना सूर दिला. त्यामुळे त्यांचा शंभरावा वाढदिवस दिल्लीत भव्य दिव्य स्वरूपात साजरा करु. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ही आमंत्रण देऊ, या कार्यक्रमाचे आमंत्रण आजच वांद्रे पश्चिम येथील रसिकांना देतो, असे सांगत त्यांनी रफी यांच्या काही गाण्यांशी आपल्या वैयक्तिक आठवणी कशा जोडलेल्या आहेत हे सांगितले.

या कार्यक्रमात खास उपस्थित असलेल्या पंडित सुरेश वाडकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या आमदार अँड आशिष शेलार यांचे आभार मानत गीतकार संतोष आनंद यांच्या सोबत रेकॉर्डिंग करणे हा एक उत्सव असायचा तो आज डोळ्या समोर उभा राहिला. असे सांगत संतोष आनंद यांचे त्यांनी गायलेले मेघा रे मेघा रे... आणि प्रेम रोग मधील गाणी प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात सादर केली.

आमदार ॲड. आशिष शेलार यांनी कार्यक्रमाचे आयोजनाची कल्पना विषद करुन आपण रफी यांच्या गाण्याशी कसे जोडलेले आहोत, हे सांगितले. 

वांद्रे पश्चिम रंगशारदा येथे झालेल्या या शानदार सोहळ्यात जीवनगाणीतर्फे "फिर रफी" या बहारदार मैफिलीत ख्यातनाम गायक श्रीकांत नारायण यांनी मोहम्मह रफी यांची अजरामर गाणी सादर करून उपस्थितीतांची मने जिंकली. दरवर्षी प्रमाणे रफी यांच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती.

Web Title: Muhammad Rafi's 100th birthday will be celebrated in Delhi next year; Announcement by Union Minister Piyush Goyal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.