MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 06:13 IST2025-06-24T06:11:54+5:302025-06-24T06:13:17+5:30

Msrtc white paper: महामंडळाच्या कार्यालयामध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी एसटीचा आर्थिक लेखाजोखा जाहीर केला.

MSRTC: ST has gone into a 'pit'; 37 years of loss-making journey, ST Corporation's white paper released | MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर

MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर

मुंबई : राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाने १९८० पासून आतापर्यंत ३७ वर्षे तोटा आणि केवळ आठ वर्षेच नफा नोंदवला असून, २०२३-२४ मध्ये एसटीचा संचित तोटा १० हजार ३२४ कोटींवर गेला आहे.

महामंडळाच्या कार्यालयामध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी एसटीचा आर्थिक लेखाजोखा जाहीर केला. त्यात गेल्या सहा वर्षांमध्ये एसटीचा तोटा दुपटीपेक्षा जास्त वाढल्याचे समोर आले आहे. श्वेतपत्रिका तयार करताना ४५ वर्षाचा आर्थिक डेटा विचारात घेण्यात आला आहे.

कोणत्या वर्षात झाला नफा?

१९८७-८८, १९९०-९१, १९९४-९५, १९९५-९६, २००६-०७, २००७-२००८, २००८-०९, २००९-१०

महसूल वाढीच्या उपाययोजना

श्वेतपत्रिकेनुसार, महसूल वाढवण्यासाठी महामंडळाकडून नवीन बसची खरेदी, मालकीच्या जागांवर खासगी वाहनांसाठी इंधन पंप उभारण्यात येणार आहेत. 

त्यासाठी इंधन पुरवठादारांशी महसूल वाटप करार केले जाणार आहेत. तसेच महामंडळाच्या मालमत्ता पीपीपी तत्त्वावर विकसित केल्या जाणार आहेत.

कर्मचारी आणि बसची घटती संख्या

महामंडळात पूर्वी एक लाखाहून अधिक कर्मचारी आणि १८,५०० बस होत्या. आता कर्मचाऱ्यांची संख्या ८७ हजार आणि बसची संख्या १४,५०० आहे. 

बसची घटती संख्या आणि जुन्या बसमुळे होणारे वारंवार ब्रेकडाऊन हीदेखील तोट्याची प्रमुख कारणे आहेत. कर्मचाऱ्यांची ३,२९७ कोटींची देणी थकीत आहेत. 

Web Title: MSRTC: ST has gone into a 'pit'; 37 years of loss-making journey, ST Corporation's white paper released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.