एमपीएससी चुकीच्या उत्तरासाठी कापणार एक चतुर्थांश गुण; निकाल लागणार अपूर्णांकात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 01:09 AM2020-09-09T01:09:16+5:302020-09-09T01:09:28+5:30

सुधारित कार्यपद्धतीची माहिती जाहीर

MPSC will cut a quarter mark for wrong answer; The result will be in fractions | एमपीएससी चुकीच्या उत्तरासाठी कापणार एक चतुर्थांश गुण; निकाल लागणार अपूर्णांकात

एमपीएससी चुकीच्या उत्तरासाठी कापणार एक चतुर्थांश गुण; निकाल लागणार अपूर्णांकात

Next

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) परीक्षांचे सुधारित वेळापत्रक सोमवारी जाहीर केल्यानंतर परीक्षेच्या सुधारित कार्यपद्धतीची माहिती लगेच जाहीर केली. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांसाठी नकारात्मक गुण अंमलबजावणीसाठी (निगेटिव्ह मार्किंग) सुधारित कार्यपद्धत त्यांनी मंगळवारी जाहीर केली. दोन महत्त्वाचे बदल म्हणजे, इथून पुढे परीक्षांचा निकाल अपूर्णांकात लागेल व प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा होतील.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षेसाठी चार चुकीच्या उत्तरांसाठी एक गुण वजा करण्याची नकारात्मक गुणांची पद्धत २००९ मध्ये सर्वप्रथम लागू केली. नंतर राज्य सेवा परीक्षेच्या संदर्भात नकारात्मक गुण वजा करण्याची कार्यपद्धती काही बदलांसह अबलंबिवण्यात आली. यापुढे सर्व वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांसाठी नवीन कार्यपद्धती विहित केल्याचे आयोगाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले. ही कार्यपद्धत सर्व स्पर्धा परीक्षा, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा तसेच चाळणी परीक्षांसाठी लागू आहे. यापुढे जाहीर होणाऱ्या सर्व लेखी परीक्षांच्या निकालासाठीही हीच पद्धत असेल.

अशी आहे सुधारित कार्यपद्धती

च्प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी २५ टक्के किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील.
च्एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिल्यास त्या प्रश्नाचे उत्तर चुकीचे असल्याचे ग्राह्य धरून त्या उत्तरासाठी २५ टक्के किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून कमी करण्यात येतील.
च्वरीलप्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल.
च्एखाद्या प्रश्नाचे उत्तर न दिल्यास त्यासाठी नकारात्मक गुण पद्धत लागू नसेल.

Web Title: MPSC will cut a quarter mark for wrong answer; The result will be in fractions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.