एमपीएससी चा विद्यार्थ्यांना दिलासा, केंद्र बदलण्यासाठी संधी आणि मुदतवाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 16:02 IST2020-08-19T16:02:18+5:302020-08-19T16:02:43+5:30
राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता खेड्यापाड्यातील उमेदवारांना अन्य जिल्ह्याच्या परीक्षा केंद्रांवर उपस्थितीत राहण्यास अडचणी येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी आयोगाने 11 ऑक्टोबरला होणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षेच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीने जिल्हा केंद्र निवडण्याची संधी दिली आहे.

एमपीएससी चा विद्यार्थ्यांना दिलासा, केंद्र बदलण्यासाठी संधी आणि मुदतवाढ
मुंबई - 'एमपीएससी'ने विद्यार्थ्यांसाठी दोन मोठे निर्णय घेतले आहेत. राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता खेड्यापाड्यातील उमेदवारांना अन्य जिल्ह्याच्या परीक्षा केंद्रांवर उपस्थितीत राहण्यास अडचणी येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी आयोगाने 11 ऑक्टोबरला होणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षेच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीने जिल्हा केंद्र निवडण्याची संधी दिली आहे. तर 20 सप्टेंबरच्या राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी पुणे केंद्र निवडलेल्या दुसऱ्या विभागातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्यासाठी आयोगाने 20 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे.