mp navneet rana was shifted from icu to normal room today as condition is stable | "आपल्या प्रार्थनेमुळे, मी मरता मरता वाचले", खासदार नवनीत राणा आयसीयूतून बाहेर

"आपल्या प्रार्थनेमुळे, मी मरता मरता वाचले", खासदार नवनीत राणा आयसीयूतून बाहेर

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपूर्वी नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यांना अमरावतीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाल्यामुळे त्यांना आज आयसीयूमधून सामान्य कक्षात हलविण्यात आले आहे. नवनीत राणा यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यांना अमरावतीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर सहा दिवस उपचार सुरु होते. मात्र, त्यांची अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना नागपूरच्या वोक्हार्ट रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची तब्बेत आणखी बिघडल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

दरम्यान, नवनीत राणा यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहे. आता त्यांची  प्रकृती स्थिर झाल्याने त्यांना आयसीयूमधून सामान्य कक्षात हलविण्यात आले आहे. याबाबत स्वत: नवनीत राणा यांनी फेसबुकवर पोस्ट करुन माहिती दिली आहे. "आज मला आयसीयूमधून सामान्य कक्षात स्थलांतर करण्यात आले आहे, आता माझी प्रकृती थोडी स्थिर आहे, आपण सर्वांचा आशीर्वाद माझ्या सोबत आहे, मी लवकर बरी होऊन जनसेवेत पुन्हा सज्ज होणार" असे नवनीत राणा यांनी फेसबुक पोस्ट करताना म्हटले आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: mp navneet rana was shifted from icu to normal room today as condition is stable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.