राणा म्हणाल्या, पोलिसांनी पाणीही दिलं नाही; आयुक्तांकडून थेट चहा पितानाचा व्हिडीओ शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 02:33 PM2022-04-26T14:33:36+5:302022-04-26T14:41:53+5:30

खासदार नवनीत राणांच्या आरोपांमध्ये किती तथ्य? आयुक्तांनी शेअर केलेल्या व्हिडीओमुळे प्रश्न उपस्थित

mp navneet rana and mla ravi rana taking tea in police station mumbai cp shares video | राणा म्हणाल्या, पोलिसांनी पाणीही दिलं नाही; आयुक्तांकडून थेट चहा पितानाचा व्हिडीओ शेअर

राणा म्हणाल्या, पोलिसांनी पाणीही दिलं नाही; आयुक्तांकडून थेट चहा पितानाचा व्हिडीओ शेअर

Next

मुंबई: कोठडीत असताना पोलिसांनी पाणीही दिलं नाही, असा आरोप करून थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिणाऱ्या खासदार नवनीत राणा यांचा एक व्हिडीओ मुंबई पोलीस आयुक्तांनी ट्विट केला आहे. यामध्ये राणा दाम्पत्य पोलीस ठाण्यात चहा पित असताना दिसत आहे. दोघांसमोर पाण्याच्या बाटल्या आहेत. राणा दाम्पत्य खुर्चीत बसून चहा पित असताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. 

पोलीस ठाण्यात पाणी देण्यात आलं नाही. वॉशरुमलाही जाऊ दिलं नाही, असे आरोप खासदार नवनीत राणांकडून करण्यात आले होते. त्या संदर्भात त्यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं. यानंतर गृह मंत्रालयानं राज्य सरकारला सविस्तर अहवाल देण्यास सांगितला. या घडामोडी सुरू असताना मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडेंनी राणा दाम्पत्याचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे.

राणा दाम्पत्याला शनिवारी अटक झाली. त्यांना खार पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. त्यावेळचा व्हिडीओ पांडेंनी शेअर केला आहे. 'आम्ही अधिक काही बोलायची गरज आहे का?' असं पांडेंनी ट्विटसोबत म्हटलं आहे. त्यामुळे राणा यांच्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

राणांकडून गंभीर आरोप; लोकसभा अध्यक्षांना पत्र
खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून तुरुंगात मिळालेल्या वागणुकीबद्दल गंभीर आरोप केले. "मला 23 एप्रिल 2022 रोजी खार पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. मी संपूर्ण रात्र पोलीस स्टेशनमध्ये काढली. मी पिण्यासाठी पाणी मागितले, पण मला रात्रभर पाणीही दिले नाही. पाणी मागितल्यामुळे मला जातीवाचक शिवीगाळ केली. मी अनुसूचित जातीची आहे, यामुळे मला पाणी पिण्यासारखा मूलभूत हक्कही नाकारण्यात आला."  

Web Title: mp navneet rana and mla ravi rana taking tea in police station mumbai cp shares video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.