खासदार गजानन कीर्तिकर यांना कोरोनाची लागण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2020 17:48 IST2020-10-16T17:48:23+5:302020-10-16T17:48:43+5:30
Corona News : काल रात्री ते स्वतः उपचारासाठी लीलावती हॉस्पिटल दाखल झाले.

खासदार गजानन कीर्तिकर यांना कोरोनाची लागण
मुंबई : उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे खासदार व शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची कोविड चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. काल रात्री ते स्वतः उपचारासाठी लीलावती हॉस्पिटल दाखल झाले.
गेली सहा महिने कोविड मध्ये ते मतदार संघात सक्रीय आहेत.तर मतदार संघातील समस्या सोडवण्यासाठी त्यांनी मतदारसंघाच्या विविध भागांचा पाहणी दौरा केला आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी वर्सोवा लोखंडवाला भागाच्या समस्या सोडवण्यासाठी पालिका प्रशासन, स्थानिक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह संयुक्त पाहणी केली होती.
दरम्यान खासदार गजानन कीर्तिकर यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हंटले आहे की,मी काल माझी कोविड 19ची तपासणी करून घेतली,ती पॉझिटिव्ह आली.तुम्हा सर्वांच्या आशिर्वादाने प्रकृती उत्तम आहे व मी इस्पितळात उपचार घेत आहे.गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की,आपण योग्य ती काळजी घ्यावी व आवश्यक खबरदारी बाळगावी. त्यांचे गोरेगाव पूर्व आरे रोड येथील स्नेहदीप कार्यालय काही दिवस खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवले असल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली.
शिवसैनिकांमध्ये भाऊ या नावाने ते लोकप्रिय असून कोविड योध्दा भाऊ गेट वेल सून, लवकरात लवकर कोरोना मुक्त होवून भाऊ पून्हा आपल्या सेवेच्या कामात रूजू होवोत अशीच सदिच्छा अनेक शिवसेनेचे पदाधिकारी,शिवसैनिक व त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे.