...तर फेब्रुवारी 2019 मध्ये कंगना अडकणार लग्नबंधनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2018 16:06 IST2018-02-05T15:53:00+5:302018-02-05T16:06:20+5:30

बॉलिवूडमधील क्वीन कंगना राणौतनं पुढच्या वर्षी लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती दिली

movie-actress-kangana-ranaut-says-she-will-get-married-before-february-2019 | ...तर फेब्रुवारी 2019 मध्ये कंगना अडकणार लग्नबंधनात

...तर फेब्रुवारी 2019 मध्ये कंगना अडकणार लग्नबंधनात

नवी दिल्ली - बॉलिवूडमधील क्वीन कंगना राणौतनं पुढच्या वर्षी लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती दिली. नुकत्याच झालेल्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये हा खुलासा केला आहे. फॅशन डिझायनर श्यामल यांच्या शोस्टॉपवर ती हजर होती.  लॅक्मे फॅशन वीकनंतर माध्यमांशी बोलताना तिला एका पत्रकारानं लग्नाबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर बोलताना तिनं सांगितले की, जर सर्व सुरळीत झालं तर फेब्रुवारी 2019 मध्ये लग्न करण्याचा विचार आहे. 

2017 मध्ये लग्नबंधनात अडकणार असल्याचे एकदा कंगनाने सांगितले होते. याची आठवण एका पत्रकारानं करुन दिली असता ती म्हणाली, खरं आहे. मला थोडा वेळा द्या. फेब्रुवारी 2019 पर्यंतचा. जर सर्व व्यवस्थित झालं तर मी लग्न करेन. दरम्यान,  गेल्यावर्षी कंगनानं लग्न करणार असल्याची घोषणा केली होती. त्यावेळी पूर्ण बॉलिवूडजगतात चर्चेला उधान आलं होतं. यावर ती बोलताना म्हणाली, की ज्यावेळी आपण लहान असतो त्यावेळी आपलं दुसऱ्या एखाद्या गोष्टीला प्राधान्य दिलं जातं. शादी एक प्रकारे बंधन आहे. यामध्ये स्वत:ला वेळ नाही राहत. यामध्ये तूम्ही एकटे राहू शकत नाही. आपल्या सहकऱ्यासोबत आपल्याला जगायचं असते. 

मी माझ्या बहिणीसोबत पार्टीत जाते. डिटिंग करु शकते पण लोग त्यावर चित्रविचित्र बोलू लागतात. आपल्या लोकांची मावनसिकता अजून तशीच आहे. माझ्या भावाचं लग्न झालेल्या आहे. तर बहिणीला आता मुल होणार आहे. आशामध्ये आपलं कुटुंब आपल्या परिवारात व्यस्त असतं. आयुष्य जसं पुढं जातं, तशी कुटुंबाची गरज भासायला लागते. सुट्ट्यांच्या दिवशी या सगळ्यांना एकत्र एकमेकांसोबत वेळ घालवताना पाहून मलाही लग्न करावसं वाटू लागलंय. लवकरच मी लग्न करणारेय, तरी पुढच्या वर्षी फेब्रुवारीपर्यंत लग्न झालेले असेल, असे तिने स्पष्ट केले आहे. 

दरम्यान, सद्या कंगना राणौत तिच्या आगामी 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटाच्या चित्रकरणामध्ये व्यस्त आहे. 

Web Title: movie-actress-kangana-ranaut-says-she-will-get-married-before-february-2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.