सरकारला जाग येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच; आत्महत्याग्रस्त मराठा कुटुंबाचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 04:10 IST2018-11-21T04:10:41+5:302018-11-21T04:10:53+5:30

मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या मराठा कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांनी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या नेतृत्वाखाली मंगळवारपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

The movement continues till the government is awake; The determination of the suicidal Maratha family | सरकारला जाग येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच; आत्महत्याग्रस्त मराठा कुटुंबाचा निर्धार

सरकारला जाग येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच; आत्महत्याग्रस्त मराठा कुटुंबाचा निर्धार

मुंबई : मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या मराठा कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांनी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या नेतृत्वाखाली मंगळवारपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. शासनाने १० लाख रुपये आणि शासकीय नोकरीचे आश्वासन पाळले नसल्याने उपोषण सुरू केल्याची माहिती समन्वयकांनी दिली.
उपोषणातील १७ आत्महत्याग्रस्त कुटुंबांपैकी नांदेडच्या मनकरणा गणपत आबादार यांनी सांगितले की, आरक्षणासाठी पतीने आत्महत्या केली. मात्र सत्ताधारी पक्षातील कोणत्याही नेत्याने सांत्वन किंवा मदत केली नाही. घरी १२ वर्षांची मुलगी, ५ वर्षांचा मुलगा आहे. एक एकर शेतीत कुटुंब कसे चालवायचे, हा प्रश्न आहे. सरकारने शासकीय नोकरी आणि १० लाखांच्या मदतीची केवळ घोषणा केली. ५ आॅगस्टला पतीने आत्महत्या केली असूनही तीन महिन्यांनंतरही सरकार झोपलेलेच आहे. परिणामी, सरकारला जाग येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार आहोत.
तर, बीडचे तुकाराम काटे म्हणाले की, मी शेतमजुरी करतो. मुलांच्या शिक्षणासाठी पैसे नसल्याचे कारण लिहीत माझ्या मुलाने आत्महत्या केली. त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी म्हाताऱ्या खांद्यावर आली आहे. सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे किमान नातवाला सरकारी नोकरी दिली, तर उदरनिर्वाह करता येईल.
दरम्यान, ओबीसींमधील इतर जातींच्या आरक्षणाला धक्का न लावता सरकारने ओबीसीमध्येच स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी या वेळी समन्वयकांनी केली.

Web Title: The movement continues till the government is awake; The determination of the suicidal Maratha family