By admin | Published: May 13, 2014 11:56 AM2014-05-13T11:56:10+5:302014-05-13T11:56:34+5:30
मेंदूचा क्षय आणि अन्य दुर्धर रोगाची लागण झालेल्या एका माथेफिरू रुग्णाने अचानक वॉर्डमधील तिघांवर केलेल्या प्राणघातक हल्ल्यात एक रुग्ण ठार झाला.
Next
बॉॅम्बे हॉस्पिटलमध्ये घडला थरारक प्रकार
मुंबई : मेंदूचा क्षय आणि अन्य दुर्धर रोगाची लागण झालेल्या एका माथेफिरू रुग्णाने अचानक वॉर्डमधील तिघांवर केलेल्या प्राणघातक हल्ल्यात एक रुग्ण ठार झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. बॉम्बे हॉस्पिटलच्या जनरल वॉर्डमध्ये सकाळी साडेसहाच्या सुमारास हा भीषण प्रकार घडला. एका रुग्णाने अन्य रुग्णांवर अशाप्रकारे हल्ला करण्याची मुंबईतील ही पहिलीच घटना असावी. हल्लेखोर रुग्णाचे नाव शहाबुद्दीन मोहबली तालुकादार (वय ४२) असे आहे. शहाबुद्दीन आग्रीपाड्याचा रहिवासी असून, मेंदूतील क्षय आणि अन्य दुर्धर रोगावरील उपचारांसाठी तो ८ मे रोजी बॉम्बे रुग्णालयात दाखल झाला. त्याला जनरल वॉर्डमध्ये दाखल करून घेण्यात आले होते. त्याच्या विविध चाचण्या सुरू होत्या. पहाटे सहाच्या सुमारास शहाबुद्दीन शौचालयात गेला. तेथून परतताच अचानक तो हिंसक झाला. बेडजवळचा सलाइनचा स्टॅण्ड घेऊन तो आसपासच्या रुग्णांवर धावून गेला. कर्करोगावरील उपचारांसाठी याच वॉर्डमध्ये दाखल असलेले लीलाबिहारी गोवर्धन ठाकूर हे शहाबुद्दीनचे पहिले लक्ष्य ठरले. त्याने ठाकूर यांच्या डोक्यात आणि चेहर्यावर लोखंडी स्टॅण्डचे घाव घातले. ठाकूर यांना रक्ताच्या थारोळ्यात सोडून शहाबुद्दीनने आपला मोर्चा प्रफुल्लचंद लिवनलाल परमार या रुग्णाकडे वळवला. त्यांच्याही डोक्यात स्टॅण्डचे घाव घालून शहाबुद्दीन तिसर्या रुग्णाकडे वळला. मात्र वॉर्डातच थांबलेले या रुग्णाचे (पान ३ वर) क्षय आणि अन्य दुर्धर आजार यातून कधीच बरा होणार नाही, या विचाराने शहाबुद्दीन नैराश्याच्या गर्तेत असावा आणि त्यातूनच त्याने हा हल्ला केला असावा, असा अंदाज पोलीस वर्तवित आहेत. माथेफिरू रुग्ण जेजे रुग्णालयात हल्ल्यानंतर शहाबुद्दीनला तत्काळ जे. जे. रुग्णालयाच्या मानसोपचार विभागात हलविण्यात आले. त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा नोंद झाला असला तरी रात्री उशिरापर्यंत त्याला अटक करण्यात आलेली नव्हती. याबाबत उपायुक्त राजेंद्र शिसवे यांनी सांगितले की, आरोपी मानसिक, शारिरीकदृष्ट्या पोलीस चौकशीसाठी, जबाब देण्यासाठी सक्षम आहे का, हे डॉक्टरांकडून जाणून घेतल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल.