Join us

जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 06:34 IST

मुंबई: आझाद मैदानात मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दोनशे ते अडीचशे अधिकाऱ्यांसह १५०० हून अधिक पोलिसांचा फौजफाटा सज्ज करण्यात ...

मुंबई: आझाद मैदानात मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दोनशे ते अडीचशे अधिकाऱ्यांसह १५०० हून अधिक पोलिसांचा फौजफाटा सज्ज करण्यात आला आहे, अशी माहिती सहपोलिस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी दिली. अफतांना पेव फुटू नये म्हणून सायबर पोलिसांचे विशेष लक्ष असेल.अशा आहेत उपाययोजनागर्दीच्या, महत्त्वाच्या आणि अतिसंवेदनशील ठिकाणी बॉम्ब शोधक व नाशक पथके, श्वान पथकांच्या माध्यमातून तपासणी करण्यात येत आहे. तसेच महत्त्वाच्या आणि अतिसंवेदनशील ठिकाणी एसआरपीएफ प्लाटून, शीघ्रकृती दलाची पथके तैनात आहेत.शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून मुंबई पोलिस आयुक्तालयातील मुख्य नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवण्यात येत आहे. पोलिसांनी शहरातील पाचही प्रवेशद्वारांसह महत्त्वांच्या ठिकाणी नाकाबंदी करून संशयित वाहने, वस्तू आणि व्यक्तींची तपासणी सुरू केली असून, हॉटेल्स, लॉजचीही तपासणी सुरू आहे.

टॅग्स :मराठा आरक्षणमनोज जरांगे-पाटीलपोलिस