गुगल सर्च इंजिनवर अधिकाधिक मराठीचे अस्तित्व हवे - डॉ. निरंजन राजाध्यक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 01:16 AM2020-01-17T01:16:13+5:302020-01-17T01:16:27+5:30

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याची सांगता

More and more Marathi is wanted on Google search engine - Dr. Niranjan Rajesh President | गुगल सर्च इंजिनवर अधिकाधिक मराठीचे अस्तित्व हवे - डॉ. निरंजन राजाध्यक्ष

गुगल सर्च इंजिनवर अधिकाधिक मराठीचे अस्तित्व हवे - डॉ. निरंजन राजाध्यक्ष

googlenewsNext

मुंबई : नवीन पिढीत मराठी भाषेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी गुगलसारख्या सर्च इंजीनवर अधिकाधिक मराठीचे वास्तव्य असणे गरजेचे आहे. मराठी साहित्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी मेट्रो-३च्या स्थानकांच्या भिंतींचा अधिकाधिक वापर करण्याचे त्यांनी सुचवले. न्यू यॉर्क आणि लंडन मेट्रोने तेथील लेखकांचे साहित्य त्यांच्या मेट्रो स्थानकांच्या भिंतींवर जिवंत ठेवले आहे़, असे वित्त मंत्रालय, रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया, तसेच नीती आयोग यांसारख्या संस्थांमध्ये धोरणात्मक बाबतीत महत्त्वाचे योगदान देणारे अर्थतज्ज्ञ डॉ. निरंजन राजाध्यक्ष यांनी सांगितले़

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरशनद्वारे (एमएमआरसी) आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा समारोप नुकताच पार पडला. या वेळी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. विजया राजाध्यक्ष यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी प्रसिद्ध साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज आणि गझलसम्राट सुरेश भट यांच्या कवितेतील ओळी म्हणून कॉर्पोरशनमधील सर्व अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना मंत्रमुग्ध केले. कॉर्पोरेशनद्वारे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत विजयी ठरलेल्या अधिकारी आणि कर्मचाºयांना गौरविण्यात आले. या वेळी एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे म्हणाल्या, कुलाबा-वांद्रे- सीप्झ मेट्रो-३ प्रकल्पात मराठीचा झेंडा नेहमी उंच राहील. किंबहुना मार्गिकेतील एका स्थानकाचे नाव ‘आचार्य अत्रे चौक स्थानक’ असे निश्चित केले आहे. या प्रकल्पात अधिकाधिक मराठीचा वापर करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

मराठी भाषेचे वैभव जपण्याच्या हेतूने एमएमआरसीद्वारे १ ते १५ जानेवारीदरम्यान साजरा करण्यात आलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यादरम्यान निबंध स्पर्धा, काव्य लेखन स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा तसेच वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धांना कर्मचाºयांसह अधिकाºयांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

डॉ़ विजया राजाध्यक्ष यांच्याकडून विशेष मेजवानी
साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या डॉ. राजाध्यक्ष यांनी कुसुमाग्रजांच्या ‘अनंत आमुची ध्येयासक्ती अन् आशा, किनारा तुला पामराला’ तसेच सुरेश भट यांचे मराठी अभिमान गीत ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ या कवितांची आवर्जून आठवण काढली. उपस्थित असलेले शंभरहून अधिक अधिकारी आणि कर्मचाºयांसाठी ८६ वर्षीय ज्येष्ठ साहित्यिका डॉ. विजया राजाध्यक्ष यांनी वाचलेल्या कविता म्हणजे मेजवानीच होती.

पारितोषिक विजेते
घोषवाक्य स्पर्धा - १) नुपूर चित्ते २) अमोल पाटील ३) मनीष दुसाने ४) कृतिका बब्बर
निबंध स्पर्धा - १) मयूर कदम २) नभा शिरोडकर ३) विश्वास अजनाळकर
काव्य लेखन - १) तेजस्वी साळवे २) राहुल गिजे ३) नयन भाटिया ४) योगेंद्र मोरे
वक्तृत्व स्पर्धा - १) नुपूर चित्ते २) दीक्षांत मेश्राम ३) अमोल पाटील ४) भारती शर्मा

Web Title: More and more Marathi is wanted on Google search engine - Dr. Niranjan Rajesh President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marathiमराठी