Join us  

मुंबईत ७ लाखांहून अधिक स्मार्ट मीटर्स बसणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2020 3:04 PM

८ ग्राहकसेवा केंद्रांवर २५ हून अधिक हेल्प डेस्क स्थापन

 

मुंबई : ऑटोमेटेड मीटर रीडिंगसाठी स्मार्ट मीटर्स बसवण्याकरिता वीज आयोगाने भांडवली खर्चाच्या योजनांना मंजुरी दिली आहे. परिणामी अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड येत्या काही महिन्यांत ७ लाखांहून अधिक स्मार्ट मीटर्स बसवणार आहे. यामुळे ग्राहकांना त्यांच्या वीजवापराविषयी रिअल-टाइम माहिती मिळत राहील. आणि मानवी हस्तक्षेपाशिवाय मीटर वाचन होऊ शकेल. दरम्यान, लॉकडाउनची मुदत आता ३१ जुलै पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे घरी राहून केल्या जाणाऱ्या कामाचे तासही वाढले आहेत. घरून काम करणे तसेच सध्याच्या हवामानाच्या परिस्थितीमुळे घरगुती विजेचा वापर खूपच वाढला आहे. राज्य सरकार व नियामक यंत्रणेने जारी केलेल्या निर्देशानुसार वीज कंपन्या पुढे सरसावलया आहेत. आणि त्यानुसार त्यांनी इंटरऑक्टिव ई-बिल सुविधा, डिजिटल पेमेंटचे अनेक मार्ग, ग्राहकांच्या सोयीसाठी हप्त्यांमध्ये (ईएमआय) बिल भरण्याची सवलत अशी अनेक पावले उचलून ग्राहकांच्या समस्यांचे निरसन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

बिलिंगची प्रक्रिया स्पष्ट करून सांगणारा इन्फोग्राफिक व्हिडिओ यूट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहे. ग्राहकांच्या माहितीसाठी व त्यांना प्रक्रिया समजावी म्हणून हा व्हिडिओ त्यांना एसएमएस/ईमेल/व्हॉट्सअॅपद्वारे पाठवण्यातही आला आहे. ग्राहक वेबसाइटला भेट देऊन त्यांची बिले स्वत: तपासून बघू शकतात. वापरलेली अचूक एकके (युनिट्स), टेरिफ दर, उपलब्ध टेरिफ स्लॅब लाभ या निकषांवर ते त्यांचे बिल कसे तयार करण्यात आले आहे? हे समजून घेऊ शकतात. गेल्या वर्षातील या कालखंडादरम्यानची तुलनाही बिलावर उपलब्ध आहे. ग्राहक त्यांचे तपशील भरून वेबसाइटवर त्यांची बिले स्वत: तपासू शकतात आणि बिलावरील मीटर वाचन, वीजवापर व देय रक्कम पडताळून बघू शकतात. यामुळे त्यांच्या शंकांचे निरसन जलदगतीने होऊ शकते. जर वर्तमान मीटर वाचन बिलावर नमूद मीटर वाचनाहून अधिक असेल, तर बिल अचूक आहे. ग्राहकांना प्राप्त होणाऱ्या बिलांवर वर्तमान मीटर वाचन, एकूण देय रक्कम आणि मार्च व एप्रिल महिन्यांतील दुरुस्त्यांचे तपशील दिलेले आहेत. बिलातील दुरुस्त्यांबाबतचे तपशील तपासण्यासाठी ग्राहक संकेतस्थळाचा आधार घेऊ शकतात.

८ ग्राहकसेवा केंद्रांवर २५ हून अधिक हेल्प डेस्क स्थापन करण्यात आले आहेत. ग्राहक त्यांच्या शंकांचे निरसन करून घेण्यासाठी सर्व केंद्रांवरील व्हिडिओ कॉल सुविधेचा लाभ घेऊ शकतात. क्रेडिट कार्डाद्वारे बिल भरण्यासाठी वेबसाइटवर ईएमआय सुविधा उपलब्ध आहे. पर्यायी पेमेंट पद्धती वापरणारे पात्र ग्राहकही एमईआरसीच्या पुरवठा नियमांनुसार ३ महिन्यांच्या हप्त्याची सुविधा उपलब्ध करून घेऊ शकतात. ग्राहकाच्या शंकांचे पूर्ण निरसन होत नाही, तोवर कोणतीही वीजजोडणी बिल न भरले गेल्याच्या कारणावरून खंडित केली जाणार नाही, अशी माहिती अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडकडून देण्यात आली.  

टॅग्स :लॉकडाऊन अनलॉककोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना सकारात्मक बातम्या