Join us

मान्सून रविवारी संपुर्ण महाराष्ट्र व्यापणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2020 18:12 IST

मान्सून मुंबईच्या वेशीवर दाखल

दक्षिण गुजरातमध्येही पोहचणार

मुंबई : मान्सून शनिवारी हर्णे, अहमदनगर, औरंगाबाद, गोंदिया, चंपा आणि रांचीसह लगतच्या प्रदेशात दाखल झाला आहे. मान्सूनच्या पुढील प्रवासासाठीचे हवामान अनुकूल असून, रविवारी मान्सून मुंबईसहमहाराष्ट्राचा आणखी काही भागात व दक्षिण गुजरातमध्ये दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे.

१३ जून रोजी मान्सून महाराष्ट्राच्या बहुतांशी भागात दाखल झाला आहे. कोकणात हर्णे, मध्य महाराष्ट्रात अहमदनगर, मराठवाड्यात औरंगाबाद, विदर्भात गोंदिया येथे दाखल झाला आहे. येत्या २४ तासांत संपुर्ण महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल. शनिवारी रत्नागिरी, सिंधुदूर्ग येथे मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. येत्या चार ते पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ येथे मुसळधार पाऊस पडेल, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी दिली. दरम्यान, मुंबई शहर आणि उपनगराचा विचार करता शनिवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत पावसाने विश्रांती घेतली होती. दिवसभर शहर आणि उपनगरात ऊनं पडले होते. काही ठिकाणी ढगाळ वातावरण असल्याचे चित्र होते.

टॅग्स :मानसून स्पेशलपाऊसमहाराष्ट्रमुंबई