Monsoon schedule of Konkan Railway starts from 10th June | कोकण रेल्वेचे १० जूनपासून मान्सून वेळापत्रक सुरू

कोकण रेल्वेचे १० जूनपासून मान्सून वेळापत्रक सुरू

 

मुंबई : लॉकडाउनच्या काळात जीवनावश्यक सामग्री आणि मजुरांना मूळगावी सोडण्यासाठी कोकण रेल्वे धावत आहे. याच कालावधीत कोकण रेल्वेने मान्सूनपूर्व सुरक्षा उपाययोजनांची कामे ही पूर्ण केली आहेत.  दरवर्षीप्रमाणे यावर्षी १० जून ते ३१ ऑक्टोबरपर्यंत कोकण रेल्वेचे  मार्गावर मान्सून वेळापत्रक तयार केले आहे. सुरक्षेचे उपाय संपूर्ण मार्गावर ९७४ कर्मचारी २४ तास पेट्रोलिंगसाठी तैनात केले आहेत. दरम्यान, लॉकडाऊनमध्ये रेल्वे मंत्रालयाने ठरविलेल्या विशेष ट्रेन धावणार आहेत. 

मान्सूनच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे कडून कोलाड ते ठोकूर ७४० किमी पट्यात मान्सूनपूर्व कामांनी वेग धरला आहे. पावसात कोकण रेल्वेच्या मार्गावर पाणी येऊ नये, यासाठी पाण्याचे मार्ग मोकळे करणे, मार्गानजीकच्या दरडची पहाणी करून धोकादायक वाटणारी दरड काढून टाकण्याचे काम केले जात आहे.  मान्सूनच्या काळात  संपूर्ण कोकण रेल्वेच्या मार्गावर ९७४ कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून २४ तास गस्त घातली जाणार आहे. जी धोकादायक दरड आहेत इथे विशेष उपाययोजना केल्या गेल्या असून या ठिकाणी २४ तास कर्मचारी तैनात ठेवण्यात येणार आहे. अशा ठिकाणांवर रेल्वेचा वेग हि नियंत्रित ठेवण्यात येणार आहे. आपत्कालीन स्थितीत तात्काळ मदत मिळावी यासाठी ठराविक अंतरांवर पोकलेन मशिन्स सारखी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहेत. 

मुसळधार पावसाच्या काळात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास त्याची खबर देणारी यंत्रणा कोकण रेल्वे मार्गातीळ पुलांवर सुसज्ज केली आहे. पुराचे पाणी धोकादायक पातळीच्या वर आल्यास हि यंत्रणा अलर्ट करेल. याचबरोबर माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, विलवडे, कणकवली, मडगाव, कारवार, भटकळ, आणि उडपी येथे पर्जन्य मापक यंत्रणा मार्गावरील ९ स्थानकात सुसज्ज असून अतिवृष्टी काळात हि यंत्रणा सूचना करेल .

 

 

रेल्वेचा ४० किमी असेल 

मुसळधार पाऊस पडत असताना रेल्वेचा वेग ताशी ४० किमी असावा, अशा सूचना लोको पायलटला देण्यात आल्या आहेत.  आपत्कालीन स्थितीत मदतीकरिता असिडेन्ट रिलीफ मेडिकल व्हॅन रत्नागिरी आणि वेरना गोवा इथे तैनात ठेवण्यात आल्या आहेत . लोको पायलट आणि गार्ड यांना वॉकी टॉकी यंत्रणा पुरवण्यात आल्या आहेत. सॅटेलाईट सारखी अत्याधुनिक यंत्रणाही रिलीफ व्हॅन मध्ये सुसज्ज ठेवण्यात आली आहे. 

 

२४ तास यंत्रणा सतर्क 

     मान्सूनच्या काळात बेलापूर,रत्नागिरी आणि मडगाव या तीन ठिकाणी नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत राहून रेल्वेच्या सुरक्षित वाहतुकीवर लक्ष ठेवून आहेत. रेल्वेच्या मार्गावर मान्सून वेळापत्रक १० जून २०२० ते ३१ ऑक्टोबर २०२० या कालावधीसाठी कार्यान्वित राहील, अशी माहिती कोकण रेल्वे कडून देण्यात आहे. पावसाळयातील प्रवाश्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी कोकण रेल्वेने सर्व त्या सुरक्षा उपाय योजनासह सज्ज झाली आहे. 

 

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Monsoon schedule of Konkan Railway starts from 10th June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.