मान्सून : आता ब्रेक; पण पुन्हा २६ जुलै?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 04:04 PM2020-07-21T16:04:12+5:302020-07-21T16:09:13+5:30

दिल्लीत धुमाकूळ घातलेल्या पावसाने मुंबईत मात्र विश्रांती घेतली आहे.

Monsoon: Now break; But again July 26? | मान्सून : आता ब्रेक; पण पुन्हा २६ जुलै?

मान्सून : आता ब्रेक; पण पुन्हा २६ जुलै?

Next
ठळक मुद्देमुंबई शहर ४.५१पूर्व उपनगर १.०७पश्चिम उपनगर १.३९

मुंबई : दिल्लीत धुमाकूळ घातलेल्या पावसाने मुंबईत मात्र विश्रांती घेतली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये बरसणारा पाऊस सोमवारपासून बेपत्ता आहे. मंगळवारी तर मुंबईत कित्येक दिवसांनी कडाक्याचे ऊनं पडल्याचे पाहण्यास मिळाले. महत्त्वाचे म्हणजे धो धो कोसळलेला पाऊस बेपत्ता झाल्याने आता मुंबईतल्या ऊकाड्यात पुन्हा किंचित वाढ झाली आहे. परिणामी कोसळधारांनी चिंब भिजलेले मुंबईकर सध्याच्या क्षणी घामाच्या धारांनी न्हाहून निघत आहेत. दरम्यान, २६ आणि २७ जुलै रोजी मुंबई शहर आणि उपनगर पाऊस पुन्हा सक्रीय होईल. हा पाऊस मुसळधार ते अति मुसळधार नसला तरी सध्याच्या वातावरणाच्या तुलनेत दिलासादायक असेल.

एकीकडे कोरोना, दुसरीकडे लॉकडाऊन आणि तिसरीकडे कोसळणारा पाऊस; अशा तिहेरी वातावरणाने मुंबईकरांना घाम फोडला होता. तुरळक ठिकाणी झालेली अतिवृष्टी, तुंबलेले नाले, ठप्प झालेली रस्ते वाहतूक अशा विविध कारणांमुळे लोकप्रतिनिधींदेखील महापालिकांवर टिका करत तोंडसुख घेतले खरे; मात्र आता पावसाने विश्रांती घेतल्याने तोंडचे पाणी पळण्याची चिन्हे आहेत. कारण मुंबईला पाणी पुरवठा करत असलेल्या धरणक्षेत्रात देखील अद्याप पावसाने म्हणावी तशी बँटिंग केलेली नाही. परिणामी सध्या विश्रांतीवर असलेला पाऊस पुन्हा कधी कोसळणार? या हवामान खात्याच्या अंदाजाकडे मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड डोळे लावू बसलेले आहे.

 

मान्सूनसाठी सध्या पोषक वातावरण नाही. या आठवड्यात पाऊस पडणार नाही. आता जो काही पाऊस पडतो आहे तो दक्षिण पश्चिमी वारे आणि आर्द्रता यामुळे पडतो आहे. शिवाय कुठेही कमी दाबाचे क्षेत्र नाही. परिणामी पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र २६ जुलैच्या आसपास हवामानात मान्सूनसाठी पोषक बदल होतील. वातावरण पोषक होईल. परिणामी २६ जुलैनंतर पुन्हा एकदा पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
- शुभांगी भुते, शास्त्रज्ञ, मुंबई हवामान शास्त्र विभाग
 



स्कायमेट काय म्हणते?
- गेल्या २४ तासांपासून मुंबईत अवघ्या ३.७ मिलीमीटर एवढया पावसाची नोंद झाली आहे.
- पुढील ३ ते ४ चार दिवस मुंबईच्या हवामानात बदलाची शक्यता नाही.
- तापमानात २ ते ३ अंशानी वाढ होईल. कमाल तापमान ३३ ते ३४ अंंशाच्या आसपास नोंदविण्यात येईल.
- उत्तर कोकणात देखील सर्वसाधारण अशीच परिस्थिती राहील.
- २६ आणि २७ जुलै रोजी मुंबई शहर आणि उपनगर पाऊस पुन्हा सक्रीय होईल.
- हा पाऊस मुसळधार ते अति मुसळधार नसला तरी सध्याच्या वातावरणाच्या तुलनेत दिलासादायक असेल.

 

सरासरीच्या तुलनेत पडलेला १ जूनपासून आतापर्यंत पडलेला पाऊस टक्केवारीत.

मुंबई शहर - ३० टक्के
मुंबई उपनगर- ३५ टक्के
ठाणे - ५ टक्के
पालघर - उणे १२ टक्के
रायगड - उणे १ टक्का



पाऊस/मिमी
कुलाबा ०.६
सांताक्रूझ ३.७

 

Web Title: Monsoon: Now break; But again July 26?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.