Monsoon Update : जून संपत आला तरीही मान्सून नाही, महाराष्ट्रात पावसाला सुरुवात कधी होणार? हवामान विभागाने दिली अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 04:10 PM2023-06-22T16:10:31+5:302023-06-22T16:12:10+5:30

Monsoon Update : हवामान विभागाने मान्सून संदर्भात एक महत्वाची अपडेट दिली आहे.

monsoon imd weather update 22 june rainfall alert delhi up mumbai monsoon date good news | Monsoon Update : जून संपत आला तरीही मान्सून नाही, महाराष्ट्रात पावसाला सुरुवात कधी होणार? हवामान विभागाने दिली अपडेट

Monsoon Update : जून संपत आला तरीही मान्सून नाही, महाराष्ट्रात पावसाला सुरुवात कधी होणार? हवामान विभागाने दिली अपडेट

googlenewsNext

Monsoon Update :  जून महिन्याची २२ तारीख आली तरी राज्यात अजुनही मान्सून दाखल झालेला नाही, राज्यातील शेतकऱ्यांनी पेरण्यांची तयारी केली असून पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. पण, अजुनही पावसाला सुरुवात झालेली नाही. पावसा संदर्भात आता हवामान विभागाने अपडेट दिली आहे. मुंबईतही अद्याप मान्सून दाखल झालेला नाही. दहा दिवसांच्या विलंबानंतर आता नैऋत्य मान्सून २३ ते २५ जून दरम्यान मुंबईत दाखल होणार आहे.

ED raid on BMC मोठी बातमी! मुंबई महापालिकेवरच ईडीचा छापा; स्टेट बँकेचे अधिकारीही पोहोचले

यंदाचा मान्सून शतकातील सर्वाधिक विलंबाचा ठरू शकतो, असा इशारा हवामान विभागाने दिला. अक्षय देवरस, नॅशनल सेंटर फॉर अॅटमॉस्फेरिक सायन्सेस आणि हवामानशास्त्र विभाग, युनिव्हर्सिटी ऑफ रीडिंग, यूकेचे संशोधन शास्त्रज्ञ म्हणाले, “मान्सून २५-२६ जून दरम्यान मुंबईत दाखल होईल. हे २५ जून २०१९ रोजी सेट करण्यात आलेल्या या शतकातील सर्वात विलंबित मान्सूनचा विक्रम मोडू शकतो किंवा त्याची बरोबरी करू शकतो. सर्वात उशीरा आगमन २८ जून १९७४) चा सर्वकालीन विक्रम अबाधित राहील.

मान्सूनला उशीर झाल्याने मुंबईतही पावसाची कमतरता नोंदवली गेली आहे. IMD च्या सांताक्रूझ येथील बेस वेदर स्टेशननुसार, १ ते २१ जून दरम्यान, शहरात साधारणपणे ३२७.२ मिमी पाऊस पडतो, तर यावर्षी फक्त १७.९ मिमी पाऊस पडला. हे सर्वसामान्य प्रमाणापेक्षा ९५% कमी आहे आणि ही मोठी तूट म्हणून गणली जात आहे. पावसाअभावी या काळात तापमानही सामान्यपेक्षा जास्त राहते. गुरुवारी शहराचे कमाल तापमान ३४.३ अंश सेल्सिअस होते, जे सामान्यपेक्षा तीन अंशांनी जास्त होते. किमान तापमान २८.४ अंश सेल्सिअसवर स्थिरावले, जे सामान्यपेक्षा दोन अंशांनी जास्त आहे.

या वर्षी बिपरजॉय चक्रीवादळामुळे पाऊस लांबला आहे, हे वादळ अरबी समुद्रात सुमारे नऊ दिवसांपर्यंत सुरू होते. या काळात आपल्याला कोकणात पश्चिमेचे वारे येत नव्हते कारण केवळ या प्रणालीभोवती वारे वाहत होते . गेल्या काही दिवसांपासून पश्चिमेचे वारे पुन्हा सुरू झाले असून आठवड्याच्या शेवटी मुंबईत मान्सून सुरू होण्यासाठी परिस्थिती अनुकूल दिसत आहे. पण अर्थातच, आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल , अशी माहिती हवामान विभागाने दिली. 

Web Title: monsoon imd weather update 22 june rainfall alert delhi up mumbai monsoon date good news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.