Join us
Daily Top 2Weekly Top 5

...मगच टीव्हीसमोर येऊन पोपटपंची करा; मोहित कंबोज यांचा संजय राऊतांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 20:18 IST

जर विभुषण एकनाथ शिंदेंना बोलत असाल तर ती अभिमानाची गोष्ट आहे असं कंबोज यांनी म्हटलं.

मुंबई  -  आम्हाला आमच्या विभुषणावर गर्व आहे. संजय राऊत हे नवीन हिंदू बनतायेत, रामायण वाचून व्याख्यान देतायेत, त्यांनी कृपया आपले जनरल नॉलेज वाढवावे आणि त्यानंतर टिव्हीसमोर येऊन पोपटपंची करावी अशा शब्दात मोहित कंबोज यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

मोहित कंबोज म्हणाले की, जो नवीन नवीन मुस्लीम असतो तो ५ वेळा नमाज पठण करतो, तो खरा मुस्लीम नाही असं सांगावे लागते. संजय राऊतांनी २०२३ मध्ये नवीन रामायण वाचलं असावं. त्यांनी एकनाथ शिंदेंना म्हटलं रामायण वाचून या, २०१९ मध्येही राऊतांनी रामायण वाचली असावी परंतु ते उद्धव ठाकरेंची भूमिका कोणती हे सांगू शकले नाहीत. एकनाथ शिंदे विभुषण आहेत असं राऊत म्हणतात, परंतु त्यांना विभुषण कोणाचा भाऊ होता हे माहिती नाही. विभुषण हा रावणाचा भाऊ होता असं त्यांनी म्हटलं.

तसेच रावणाने अहंकाराने सीतेचे अपहरण केले, सर्वाना रामायणातील ही घटना माहिती आहे. त्याचरितीने खुर्चीच्या लालसेपोटी महाराष्ट्रातील रावण उद्धव ठाकरे यांनी भाजपाला धोका दिला. जर विभुषण एकनाथ शिंदेंना बोलत असाल तर ती अभिमानाची गोष्ट आहे. कारण विभुषण हा खऱ्यासोबत, श्रीरामासोबत होता. विभुषणाला रावणाने काय कुकर्म केले होते हे माहिती होते. जर विभुषणाने महाराष्ट्रातल्या रावणाची साथ सोडत ज्यांनी मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी युती तोडून, हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची साथ सोडून केवळ मुख्यमंत्रिपदासाठी सर्व सत्यानाश केला असा टोला मोहित कंबोज यांनी संजय राऊतांना लगावला.

टॅग्स :मोहित कंबोज भारतीयसंजय राऊतएकनाथ शिंदे