मोहित भारतीय यांची मुंबई भाजपाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 00:29 IST2019-08-17T00:28:41+5:302019-08-17T00:29:01+5:30
भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईचे अध्यक्ष मोहित भारतीय यांची भारतीय जनता पार्टी, मुंबई सरचिटणीसपदी शुक्रवारी नियुक्ती झाली आहे.

मोहित भारतीय यांची मुंबई भाजपाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती
मुंबई - भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईचे अध्यक्ष मोहित भारतीय यांची भारतीय जनता पार्टी, मुंबई सरचिटणीसपदी शुक्रवारी नियुक्ती झाली आहे.
मुंबई भाजपा अध्यक्ष मंगल प्रभात लोढ़ा यांनी शुक्रवारी भारतीय यांच्या नियुक्तिचे पत्र दिले. मोहित भारतीय हे 2016 पासून भाजयुमो, मुंबईचे अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यकाळात अनेक आंदोलने आणि विचिध उपक्रम राबविण्यात आले आहेत .
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या सभेची जबाबदारी त्यांच्यावर आहे. सध्या दुसऱ्या टप्प्याच्या तयारीत ते व्यस्त आहेत.
मागील तीन वर्षाच्या काळात भाजयुमो च्या पदाधिकारी यांनी खूप सहकार्य केले. यापुढे पक्षाच्या सर्व कार्यकर्त्याच्या सहयोगातून पक्षाने सोपवलेली नवीन जबाबदारी यशस्वी पार पाडू असा विश्वास श्री भारतीय यांनी व्यक्त केला.