मुंबई - आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारंकडणधील रांची येथे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडमध्ये योगासने केली. योग ही आपल्या देशाची संस्कृती आणि साधन आहे. जगाला योगसाधनेची ओळख पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करून दिली. मोदींच्याच प्रयत्नांमुळे 21 जुन हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. आज पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होत आहे.
नांदेड येथील मामा चौक येथील मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगगुरू रामदेव बाबा यांच्यासमवेत योगासने केली. तसेच योगाचे महत्त्व सांगताना, शरीर आणि मनाला दुरूस्त करणारी प्राचीन संस्कृती म्हणजे योगासन असल्याचंही फडणवीस यांनी म्हटले. यावेळी, हजारोंच्या संख्येने विद्यार्थी, नागरिक आणि योगासनप्रेमी हजर होते. येथील मैदानावर एक लाख नागरिकांच्या योगासनाची व्यवस्था करण्यात आली होती. बाबा रामदेव यांनीही योगाची लक्षणीय प्रात्यक्षिके करून उपस्थितांची मने जिंकली. तर, जागतिक योग दिवस साजरा करत असल्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी जाते, असे म्हणत मोदींचे आभार मानले.