Join us  

Budget 2019 : 'मोदी सरकार थापा मारतंय, आधी छोटं छोटं आता मोठं गाजर दाखवलंय'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2019 9:32 PM

Budget 2019 : केंद्रातील मोदी सरकारने आपल्या शेवटच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची तर क्रूर थट्टा केली आहे. हे सरकार थापा मारण्यात पटाईत आहे. गर्भवती महिलांना 26 आठवडे भरपगारी सुट्टीची तरतूद काही नवीन नाही.

मुंबई - मोदी सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यानींही सरकारने सादर केल्या बजेटवर बोचरी टीका केली आहे. शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या वार्षिक 6 हजार रुपयांच्या मानधनास त्यांनी शेतकऱ्यांची थट्टा असल्याचं म्हटलंय. तर या पैशात सत्ताधाऱ्यांनी 1 महिना घर चालवून दाखवावं असा सवालही अजित पवार यांनी केला आहे. तसेच सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे मोठं गाजर असल्याचंही ते म्हणाले. 

केंद्रातील मोदी सरकारने आपल्या शेवटच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची तर क्रूर थट्टा केली आहे. हे सरकार थापा मारण्यात पटाईत आहे. गर्भवती महिलांना 26 आठवडे भरपगारी सुट्टीची तरतूद काही नवीन नाही. यापूर्वी संसदेमार्फत करण्यात आलेल्या कायद्यात संबंधित तरतूद आधीच समाविष्ट होती. यांची सुरक्षेच्या नावानं बोंबाबोंब आहे. महिला सुरक्षेला घेऊन याठिकाणी विशिष्ट तरतूद करायला हवी होती. तर, गरीब आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्षाला 6 हजार रुपये म्हणजेच महिन्याला केवळ 500 रुपये एवढीच रक्कम मिळणार, असं समजायचं का? या निर्णयानं शेतकऱ्यांचं काय भलं होणार? पिचलेल्या शेतकऱ्यांच्या अवस्थेची आणखी किती थट्टा उडवणार? याच रकमेत सत्ताधाऱ्यांनी 1 महिना घरं चालवून दाखवावीत, असा सवालही अजित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन विचारला आहे. तसेच सरकारने आजपर्यंत छोटी गाजरं दाखवली, आता मोठं गाजर दाखवल्याचा टोलाही अजित पवार यांनी लगावला.  

.तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनीही मोदी सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा असल्याचं म्हटलंय.  

टॅग्स :अजित पवारनरेंद्र मोदीअर्थसंकल्प 2019