मुंबई-सुरत मार्गावर लवकरच 'नमो भारत' धावणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 13:02 IST2026-03-31T12:20:49+5:302026-03-31T13:02:51+5:30

'परे'चे उपनगरीय रेल्वे कनेक्टिव्हिटीसाठी नियोजन

Modern Upgrade Namo Bharat or Advanced MEMUs to Run Between Mumbai and Surat | मुंबई-सुरत मार्गावर लवकरच 'नमो भारत' धावणार?

मुंबई-सुरत मार्गावर लवकरच 'नमो भारत' धावणार?

मुंबई : पश्चिम रेल्वेकडूनमुंबई सुरतदरम्यान उपनगरीय रेल्वे सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू असून, या मार्गावर अत्याधुनिक नमो भारत ट्रेन धावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पारंपरिक लोकलऐवजी आधुनिक सुविधा असलेल्या नमो भारत किंवा अपग्रेडेड मेमू गाड्या चालवण्याचे नियोजन पश्चिम रेल्वेकडून सुरू आहे.

सध्या विरार-सुरत मेमू सेवा चालू असून, सुमारे ३० स्थानकांवर थांबत ही गाडी ५ तासांहून अधिक वेळ घेते. दररोज फक्त दोन फेन्या असल्याने प्रवाशांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतो. यासाठी सुरत स्थानकावर उपनगरीय गाड्यांसाठी स्वतंत्र प्लॅटफॉर्म उभारले जात आहेत. भविष्यात सेवा वाढवण्याची शक्यता आहे.

...म्हणून ठरणार उपयुक्त सध्याच्या इएमयू लोकल गाड्यांमध्ये शौचालयांची सुविधा नसल्यामुळे तीन तासांपेक्षा जास्त प्रवासासाठी त्या योग्य नाहीत. मात्र, नमो भारतसारख्या आधुनिक गाड्यांमुळे मुंबई-सुरत जोडणे शक्य होईल.

७२ एकरांचा मोठा कार्यालयीन जागांचा समावेश असलेला विकास आराखडा तयार करण्यात आला.

गुजरातमधील सुरत स्टेशनचा होणार कायापालट 

सुरत स्थानकाच्या कायापालटासाठी सुमारे १,५०० कोटी रुपयांच्या खर्चात विकासकामे सुरू आहेत. डिसेंबर २०२७ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार असून, सध्या सुमारे ४६ टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पात एलिव्हेटेड रोड, भूमिगत मेट्रो, बुलेट ट्रेन स्थानक आणि विमानतळाशी कनेक्टिव्हिटी दिली जाईल.

उपनगरीय सेवांचा मार्ग मोकळा 

हे प्लॅटफॉर्म तयार झाल्यानंतर सुरतवरून वलसाड, डहाणू, विरार तसेच अहमदाबाद या ठिकाणी उपनगरीय सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. 'नमो भारत' गाड्यांमध्ये एसी आणि २ नॉन - एसी डबे, शौचालयांची सुविधा, आरामदायी आसनव्यवस्था आणि रुंद दरवाजे असल्यामुळे त्या लांब पल्ल्याच्या उपनगरीय प्रवासासाठी अधिक उपयुक्त ठरतात. सध्या अहमदाबाद-भुज मार्गावर या गाड्या यशस्वीपणे धावत असल्याचे रेल्वेने सांगितले.
 

Web Title : मुंबई-सूरत रेल मार्ग: क्या जल्द ही 'नमो भारत' ट्रेन सेवा शुरू होगी?

Web Summary : मुंबई-सूरत रेल मार्ग पर जल्द ही 'नमो भारत' ट्रेनें चल सकती हैं। पश्चिम रेलवे एसी कोच और शौचालयों वाली आधुनिक ट्रेनों की योजना बना रहा है, जिससे कनेक्टिविटी में सुधार होगा। सूरत स्टेशन पर ₹1,500 करोड़ का नवीनीकरण जारी है, जिससे 2027 तक अन्य शहरों के लिए उपनगरीय सेवाएं शुरू हो जाएंगी।

Web Title : Mumbai-Surat Railway: 'Namo Bharat' Train Service Soon?

Web Summary : Mumbai-Surat railway may soon see 'Namo Bharat' trains. Western Railway plans modern trains with AC coaches and toilets, improving connectivity. Surat station upgrades worth ₹1,500 crore are underway, facilitating suburban services to other cities by 2027.