मॉडेल पूनम पांडेच्या पतीला अटक; मारहाण, शारीरिक अत्याचाराचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 07:02 IST2021-11-10T07:01:42+5:302021-11-10T07:02:13+5:30

पूनमने याआधी सप्टेंबर २०२० मध्ये सॅमविरुद्ध मारहाण आणि विनयभंगाची तक्रार दाखल केली होती.

Model Poonam Pandey's husband arrested; Allegations of assault, physical abuse | मॉडेल पूनम पांडेच्या पतीला अटक; मारहाण, शारीरिक अत्याचाराचा आरोप

मॉडेल पूनम पांडेच्या पतीला अटक; मारहाण, शारीरिक अत्याचाराचा आरोप

मुंबई : मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेने तिचा पती सॅम बॉम्बे (सॅम अहमद) याच्यावर मारहाण आणि शारीरिक अत्याचाराचा आरोप केला आहे. त्यानुसार सोमवारी त्याला वांद्रे पोलिसांनी अटक केली आहे. मॉडेलिंग क्षेत्रातून करिअर करणाऱ्या पूनमला शहरातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिच्या चेहऱ्यावर आणि हातावर जखमा झाल्या आहेत.

पूनमने याआधी सप्टेंबर २०२० मध्ये सॅमविरुद्ध मारहाण आणि विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. गोव्यात ही तक्रार दाखल करण्यात आली होती जिथे त्या महिन्याच्या सुरुवातीला हे जोडपे हनिमूनसाठी गेले होते. त्यानंतर पांडेने सांगितले होते की, तिच्या पतीने तिचा विनयभंग केला. धमकी दिली आणि मारहाण केली. तेव्हा सॅमला ताब्यात घेण्यात आले. परंतु, लगेचच दुसऱ्याच दिवशी सशर्त जामिनावर सुटका करण्यात आली. पूनम पांडेने असेही सांगितले होते की, ती तिच्या पतीसोबत काडीमोड घेणार आहे. परंतु, नंतर या जोडप्याने त्यांच्यातील मतभेद दूर केले. २७ जुलै २०२० रोजी पूनमने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करून सॅमसोबतच्या तिच्या साखरपुड्याची घोषणा केली होती. 

Web Title: Model Poonam Pandey's husband arrested; Allegations of assault, physical abuse