बालदोस्तांच्या कपडय़ांवरही मोदीझाक!

By Admin | Updated: October 3, 2014 22:52 IST2014-10-03T22:52:42+5:302014-10-03T22:52:42+5:30

महिलावर्गाच्या साडय़ा, पुरुषांसाठी खास दिवाळीनिमित्ताने झब्बे, कुर्ते, मुलींसाठी चनिया-चोली, फ्रॉक असे सारेच हटके - हटके दिसत आहे.

Modakajakera clothes clothes! | बालदोस्तांच्या कपडय़ांवरही मोदीझाक!

बालदोस्तांच्या कपडय़ांवरही मोदीझाक!

>पनवेल : सध्या सणासुदीचा हंगाम चालू आहे. त्यामुळे नागरिकांची खरेदी जोरात आहे. महिलावर्गाच्या साडय़ा, पुरुषांसाठी खास दिवाळीनिमित्ताने झब्बे, कुर्ते, मुलींसाठी चनिया-चोली, फ्रॉक असे सारेच हटके - हटके दिसत आहे. मात्र नेहमीच मुलांच्या कपडय़ात कोणतीच विविधता नसल्याने हिरमुसलेल्या मुलांना यंदा मोदींच्या ज्ॉकेट- कुत्र्याने चांगलाच भाव दिला आहे. लहानग्यांच्या कोणत्याही दुकानात गेल्यावर कपडे दिसतात ते मोदी झाकवाले. 
सध्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा हंगाम चालू आहे. त्यातच नवरात्रोत्सव आणि आगामी दिवाळीच्या सणाची वर्दी असल्याने सगळीकडे वातावरण कसे सणमय होऊन गेले आहे. निवडणुकांच्या प्रचारांसाठी प्रचारक आणि त्यांचे कार्यकर्ते खास पांढ:या कपडय़ांत चमकत असून यंदाच्या दिवाळ सणालाही शांततेचे प्रतीक असलेला पांढरा रंगच आपल्याकडे आकर्षून घेणार आहे. यात सगळ्यात भारी ठरताहेत ते मुलांचे अर्थात लहानग्यांचे कपडे. बालदोस्त म्हटल्यावर त्यांना कुठे आर्यमॅन, सुपरमॅन, स्पायडरमॅन हा आवडतोच. त्यांच्या राख्या, टोप्या अगदी चप्पल आणि शाळेतील दप्तरही तसेच असते. त्यांना जो आवडतो तोच त्यांच्यासोबत असतो. यंदा त्यांच्या दिवाळी सणातही मोदीस्टाईल लहानग्यांची फेव्हरेट स्टाईल बनणार आहे. 
राज्यातला, देशातला नाहीतर जगातला कुठलाही प्रवास असो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कपडय़ांची स्टाईल काही बदललेली नाही. त्यांच्या कपडय़ांची स्टाईल सा:यांनाच आपलीशी वाटली आणि ती काहीशी हटकीशीही वाटली. तशा मोठमोठया व्यक्तींच्या स्टाईल आजर्पयत नागरिकांनी उचललेल्या आहेत. 
त्यातच मोदींच्या कपड्यांची, पेहरावाची रचना थोडी हटके असल्याने यंदा फॅशनही मोदीमय बनली असल्याने बच्चेकंपनी खुशीत आहे. पैजामा, कुर्ता आणि वरती ज्ॉकेट असलेले हे कपडे सध्या 500-600 रुपयांपासून 4 ते 4 हजार रुपयांर्पयत दुकानांत उपलब्ध आहेत. खादीचा वापर केलेले हे कपडे लहानग्यांना गर्मीत आणि थंडीतही मस्त वाटतील. यात गुलाबी, पिवळा, चॉकलेटी, निळा असे विविधांगी रंग आहेत आणि ते भावतातही तेवढेच. पालकही खर्चाचा विचार न करता नवीन आलेली स्टाईल खरेदी करण्याकडे वळत आहे, हेही तेवढेच. (प्रतिनिधी)
 

Web Title: Modakajakera clothes clothes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.