मुंबईच्यामेट्रो-३ चा बीकेसी ते आचार्च अत्रे चौक वरळी असा दुसरा टप्पा नुकताच प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला. मेट्रो-३ ची सर्व स्थानकं भुयारी असल्यानं स्थानकात प्रवेश करताच मोबाइलचं नेटवर्क जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. भुयारात अद्याप मोबाइल नेटवर्कची सुविधा सुरू नसल्यानं मोबाइलवरुन मेट्रोचं तिकीट काढतानाही प्रवाशांची तारांबळ उडत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई मेट्रो-३ कडून प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहे.
मुंबई मेट्रो-३ च्या प्रशासनानं प्रवाशांना मेट्रो स्थानकात प्रवेश करण्याआधीच 'मेट्रो कनेक्ट ३' या मोबाइल अॅपमधून तिकीट काढण्याचा सल्ला दिला आहे. या अॅपच्या माध्यमातून तिकीट नेमकं कसं काढायचं हेही पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान, प्रत्येक स्थानकात रोखीने तिकीट काढण्याचाही पर्याय उपलब्ध आहे.
एमएमआरसीने जारी केलेली मार्गदर्शक तत्त्व...
मोबाइलला 'नो नेटवर्क'मेट्रो-३ च्या स्थानकांमध्ये प्रवेश करताच मोबाइलला नेटवर्क मिळत नसल्याचा अनुभव प्रवाशांना येत आहे. यामुळे मेट्रोच्या या प्रवासात प्रवाशांना मोबाइल वापरता येत नाही. अॅक्वा लाइनचे टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर हे धोरणांवरून सेल्युलर ऑपरेटर्ससोबतच्या वादात अडकलं असल्याचं सांगितलं जात होतं. पण एमएमआरसीने सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.
"सर्व प्रवाशांना भूमिगत मेट्रो सिस्टीममध्ये सेल्युलर कनेक्टिव्हिटी प्रदान करण्याच्या उद्देशाने, एमएमआरसीने कोणत्याही टेलिकॉम कंपनीद्वारे वापरता येणारी तटस्थ/सामायिक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी निविदा मागवल्या होत्या. ही प्रक्रिया भारतातील विमानतळ आणि मेट्रो रेलसारख्या इतर मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा प्रकल्पांनी अवलंबलेल्या सर्वोत्तम पद्धतींशी सुसंगत अशीच आहे. एमएमआरसीएलने तटस्थ पायाभूत सुविधा पुरवठादाराला सहभागी करण्यासाठी खुली निविदा प्रक्रिया हाती घेतली. टेलिकॉम कंपन्यांनी सहभागी बोलीदारांना त्यांचं समर्थन पत्र देखील दिलं, ज्यामुळे निविदा प्रक्रियेला मान्यता मिळाली. निवडलेल्या तटस्थ पायाभूत सुविधा पुरवठादाराकडे पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आणि चालवण्यासाठी आवश्यक परवानाही आहे. त्यामुळे प्रक्रियेत बेकायदेशीर कामांचे एमएमआरसीवरील कोणतेही आरोप पूर्णपणे निराधार आहेत", असं एमएमआरसीनं स्पष्ट केलं आहे.