Join us  

राज ठाकरेंची दिल्लीवारी, महाराष्ट्राच्या हिताची; संदीप देशपांडेंनी सांगितली Inside Story

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 10:43 AM

MNS Sandeep Deshpande On Raj Thackeray Delhi Visit: चार दिवसांत दुसऱ्यांदा राज ठाकरे दिल्लीला गेले असून, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.

MNS Sandeep Deshpande On Raj Thackeray Delhi Visit: चार दिवसांत दुसऱ्यांदा दिल्लीत आलेल्या राज ठाकरे यांच्या महायुतीतील सहभागावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे. सोमवारी रात्री साडेनऊ वाजता राज ठाकरे हे त्यांचे पुत्र अमित ठाकरे तसेच अन्य सहकाऱ्यांसोबत चार्टर्ड विमानाने दिल्लीत दाखल झाले. राज-शाह बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यावरून तर्क-वितर्क लढवले जात आहेत. यातच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी यावर स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. 

राज ठाकरे दिल्लीला गेलेले आहेत. कोणाला भेटत आहे, का भेटत आहे, या गोष्टी लवकरच स्पष्ट होतील. एवढे नक्की आणि आत्मविश्वासाने सांगेन की, राज ठाकरे जो निर्णय घेतील, तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल. हिंदुत्वाच्या हिताचा असेल. मराठी माणसाच्या हिताचा असेल आणि पक्षाच्या हिताचा असेल, असे संदीप देशपांडे यांनी सांगितले.

बाळा नांदगावकर खासदार झाले, तर आनंदच होईल

बाळा नांदगावकर आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. राज ठाकरे यांच्यासोबत अनेक वर्ष आहेत. बाळा नांदगावकर दिल्लीत गेले, खासदार झाले तर आम्हा महाराष्ट्र सैनिकांना आनंदच होईल, असे सांगताना राज ठाकरे जो आदेश देतील, त्यानुसार काम करणे महाराष्ट्र सैनिक म्हणून आमचे कर्तव्य आहे. राज ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणेच काम करत आलो आहोत. कधी यश आले, कधी अपयश आले. पण त्याने खचून न जाता, काम करत राहिलो आहोत, असे संदीप देशपांडे म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्रातील राजकारणाचा चिखल झाला आहे, ही वस्तुस्थिती आहे. याची सुरुवात २०१९ पासून झाली. शिवसेना आणि भाजपाने एकत्रितपणे युतीत निवडणुका लढवल्या. जनतेने युती म्हणून त्यांना कौल दिला. असे असताना शिवसेना जाऊन काँग्रेसच्या मांडीवर बसली. चिखलाची सुरुवात तिथूनच झाली. 

 

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०२४राज ठाकरेसंदीप देशपांडेमनसे