Raj Thackeray : राज ठाकरे आज लीलावती रुग्णालयात दाखल होणार; उद्या शस्त्रक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 11:03 IST2022-06-18T10:53:10+5:302022-06-18T11:03:44+5:30
MNS Raj Thackeray hip bone surgery : राज ठाकरे यांनी शस्त्रक्रियेमुळे आपला अयोध्या दौरा लांबवणीवर टाकला होता. खुद्द राज ठाकरे यांनी पुण्याच्या सभेत या शस्त्रक्रियेसंदर्भात माहिती दिली होती.

Raj Thackeray : राज ठाकरे आज लीलावती रुग्णालयात दाखल होणार; उद्या शस्त्रक्रिया
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पायावर उद्या शस्त्रक्रिया केली जाणार आहे. यासाठी राज ठाकरे हे आज लीलावती रुग्णालयात दाखल होणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज यांना पायाच्या दुखण्याचा त्रास सुरू आहे. राज ठाकरे यांच्यावर 1 जून रोजी शस्त्रक्रिया होणार होती. मात्र नंतर ती पुढे ढकलण्यात आली. कोरोना डेड सेलमुळे ॲनेस्तेशीया देऊ शकत नसल्याने, लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता.
राज यांनी शस्त्रक्रियेमुळे आपला अयोध्या दौरा लांबवणीवर टाकला होता. खुद्द राज ठाकरे यांनी पुण्याच्या सभेत या शस्त्रक्रियेसंदर्भात माहिती दिली होती. यानंतर आता उद्या हिप बोनची शस्त्रक्रिया होणार आहे. यासाठी ते आज लीलावती रुग्णालयात दाखल होतील. राज ठाकरे यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना साधारण दोन महिन्यांची सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील कार्यक्रमात राज ठाकरे यांनी आपल्या शस्त्रक्रियेबद्दल माहिती दिली होती.
राज ठाकरे काही दिवसांपूर्वी लीलावती रुग्णालयात पायाच्या शस्त्रक्रियेसाठी दाखल झाले होते. मात्र, तेथे राज यांच्या शरीरात कोरोनाच्या डेड सेल आढळून आल्या. त्यामुळे राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करणे शक्य नसल्याचे सांगितले गेले. यामुळे लीलावती रुग्णालयातून राज ठाकरे यांना पुन्हा घरी पाठवण्यात आले. शस्त्रक्रियेबद्दल माहिती देताना राज ठाकरे म्हणाले होते की, "माझ्या हिप बोनची शस्त्रक्रिया आहे. हे जाहीरपणे सांगतोय कारण कुणालाही न सांगता शस्त्रक्रियेला गेलो, तर आमचे पत्रकार बांधव कुठला अवयव काढतात काही नेम नाही."
"जवळपास 35 वर्षे माझे वजन 63 किलो इतकंच होते. पण त्यानंतर वजन आणि इतर गोष्टी वाढायला लागल्या. आपण आरोग्यासंदर्भातील पथ्यपाणी खूप गांभीर्याने घेतल्या पाहिजेत. मात्र, आपण आज करू, उद्या करू, या नादात कायम टाळाटाळ करत राहतो. मला सध्या त्रास होत असल्यामुळे मला या सगळ्याची जाणीव होत आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे" असंही राज ठाकरे यांनी म्हटलं होतं.