एमटीएनएल प्रभादेवी कार्यालयावर मनसेची धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 17:06 IST2020-09-16T17:05:27+5:302020-09-16T17:06:18+5:30

एमटीएनएलच्या विस्कळीत सेवेमुळे कामात अडथळा

MNS raids MTNL Prabhadevi office | एमटीएनएल प्रभादेवी कार्यालयावर मनसेची धडक

एमटीएनएल प्रभादेवी कार्यालयावर मनसेची धडक

मुंबई :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली काही महीने लोकांना ऑनलाइन पद्धतीने घरी बसून काम करावे लागत आहे. मात्र एमटीएनएलच्या विस्कळीत सेवेमुळे कामात अडथळा येत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्यानंतर मनसेने आज सकाळी एमटीएनएलच्या प्रभादेवी कार्यालयावर धडक देत कार्यकारी 
अधिकाऱ्याला जाब विचारला.

एमटीएनएलच्या ग्राहकांना गेली 6-7 महीने ब्रॉड बॅंड तसेच मोबाईल सेवा व्यवस्थित पुरविल्या जात नाही, विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यासात खंड पडत आहे घरी काम करणाऱ्या नोकरदारांनाही अडचणी निर्माण होत असल्याच्या तक्रारी अनेक नागरिकांनी मनसेकडे केल्या होत्या.

नागरिकांच्या तक्रारी नंतर त्यांना भेडसवणाऱ्या समस्येबाबत मनसेचे माहिम विधानसभा विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी एमटीएनएल प्रभादेवी कार्यालयात जावून याबाबत एमटीएनएलच्या कार्यकारी संचालकांकडे विचारणा केली.   

वर्क फ्रॉम होम ही संकल्पना बऱ्याच खासगी कंपन्यांनी अमलात आणली आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांचा रोजगार सुरक्षित राहिला आहे. शाळा – महाविद्यालयात देखील ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले आहे तर मीटिंग देखील झुम अेप् द्वारे होऊ लागल्या आहेत.

या सर्व बेसिक सेवा एमटीएनएल कडून त्यांच्या ग्राहकाना पुरविण्यात येतात. नागरिकांना एमटीएनएलची सेवा हवी आहे तरीही व्यवस्थापन ते चांगल्याप्रकारे देण्यास असमर्थ ठरत आहेत सर्व सेवा बंद असताना बिले का पाठविली जातात असा सवाल किल्लेदार यांनी केला.   

सेवा पूर्ववत करण्यासाठी मुंबईतील पाच झोन मध्ये 5 ठेकेदारांची नियुक्ती करण्यात करण्यात येणार असून काम जलद गतीने होण्यासाठी त्यांच्यात कामाची विभागणी करण्यात येणार आहे. त्यानुसार त्यांना कालमर्यादा देण्यात आली असून ठरलेल्या मुदतीत काम पूर्ण न झाल्यास त्यांच्या कडून दंड आकरण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे गेल्या 5 -6 महिन्यात सेवा बंद असून ग्राहकाना बिले देण्यात आली त्यात त्यांना रिबेट देण्यात येणार असल्याचे आश्वासन एमटीएनएलच्या कार्यकारी संचालकांनी दिल्याचे किल्लेदार यांनी  सांगितले.
 

Web Title: MNS raids MTNL Prabhadevi office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.