Join us
Daily Top 2Weekly Top 5

उद्धवसेनेच्या कोट्यातून मनसे ‘स्वीकृत’ झाली नाही! साईनाथ दुर्गे, कैलास पाठक, माधुरी मांजरेकर यांची निवड?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 05:39 IST

मुंबई पालिकेत ६५ नगरसेवक निवडून आल्याने तीन स्वीकृत नगरसेवक उद्धवसेनेला निवडता येणार आहे. मात्र, युतीमध्ये निवडणूक लढलेल्या मनसेने एक स्वीकृत नगरसेवक मिळावे, असा प्रस्ताव उद्धवसेनेला पाठविला.

मुंबई : स्वीकृत नगरसेवकांबाबत उद्धवसेनेकडून माधुरी मांजरेकर, साईनाथ दुर्गे व कैलास पाठक यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. यामुळे उद्धवसेनेच्या कोट्यातून एक स्वीकृत नगरसेवकपद देण्याच्या मनसेचा प्रस्ताव उद्धवसेनेने नाकारल्याचे स्पष्ट झाले. विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर या स्वीकृत नगरसेवकांची नावे महापौर रितू तावडे यांच्याकडे सादर करतील. त्यानंतर २५ फेब्रुवारीला त्यांची अधिकृत घोषणा होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुंबई पालिकेत ६५ नगरसेवक निवडून आल्याने तीन स्वीकृत नगरसेवक उद्धवसेनेला निवडता येणार आहे. मात्र, युतीमध्ये निवडणूक लढलेल्या मनसेने एक स्वीकृत नगरसेवक मिळावे, असा प्रस्ताव उद्धवसेनेला पाठविला. मनसेकडून वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक, कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण व विद्यार्थी सेनेचे राज्य संघटक चेतन पेडणेकर यांची नावे चर्चेत होती.

अखेरच्या क्षणी तिकीट नाकारले आणि...

महापालिका निवडणुकीत वडाळा येथील १७८ प्रभागमधून उद्धवसेनेच्या उपविभाग संघटक माधुरी मांजरेकर यांचे नाव निश्चित करण्यात आले होते; परंतु जागावाटपात प्रभाग मनसेला गेल्याने त्या नाराज झाल्या होत्या. मात्र, त्यांनी मनसे उमेदवारांच्या प्रचारासाठी संपूर्ण प्रभाग पिंजून काढला होता. उद्धवसेनेचा आक्रमक चेहरा अशी ओळख असणाऱ्या मांजरेकर यांनी ‘निष्ठेचे फळ’ मिळाले आहे. सभागृहात पक्षाचा आवाज बुलंद ठेवण्यास कटिबद्ध राहीन, अशी भावना व्यक्त केली आहे.

मनसेचे शहर उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्यासाठी राज ठाकरे यांनी दादरचा प्रभाग १९२ प्रतिष्ठेचा केला होता. तर, आ. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय उद्धवसेनेचे सचिव साईनाथ दुर्गे हे देखील येथून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र, दुर्गे यांनी निवडणुकीत जोरदार प्रचार करून किल्लेदार यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तर कैलास पाठक हे उद्धवसेनेच्या उत्तर भारतीय मंचचे अध्यक्ष व जोगेश्वरीचे उपविभागप्रमुख आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : MNS Rejected for Corporator Post by Uddhav Sena; Three Chosen

Web Summary : Uddhav Sena nominates Madhuri Manjrekar, Sainath Durge, and Kailas Pathak as corporators, rejecting MNS's request for a seat. Kishori Pednekar will submit names to the mayor; official announcement on February 25th.
टॅग्स :उद्धव ठाकरेमनसे