Join us  

मनसे महाअधिवेशन : ...म्हणून संजय नार्वेकरांनी राज ठाकरेंचा 'जाणता राजा' असा केला उल्लेख

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 12:45 PM

चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष व अभिनेते संजय नार्वेकर यांनी 'सांस्कृतिक महाराष्ट्र' हा तिसरा ठराव मांडला.

ठळक मुद्देअभिनेते संजय नार्वेकर यांनी 'सांस्कृतिक महाराष्ट्र' हा तिसरा ठराव मांडला. नार्वेकरांनी राज ठाकरे यांचा 'जाणता राजा' असा उल्लेख केला आहे. 'मराठी कलाकारांना जाणणारा असा हा जाणता राजा'

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं महाअधिवेशन आज मुंबईत पार पडत आहे. या महाअधिवेशनात ढोल ताशांच्या गजरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते शिवरायांची राजमुद्रा असलेल्या मनसेच्या नव्या ध्वजाचं अनावरण करण्यात आलं. मनसेच्या राजकीय वाटचालीत प्रथमच दिवसभराचे राज्यस्तरीय महाअधिवेशन होत असून त्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष व अभिनेते संजय नार्वेकर यांनी 'सांस्कृतिक महाराष्ट्र' हा तिसरा ठराव मांडला. यावेळी नार्वेकरांनी राज ठाकरे यांचा 'जाणता राजा' असा उल्लेख केला आहे. 

'साहेबांचा मोठेपणा सांगत नाही आहे. मराठी कलाकारांना जाणणारा असा हा जाणता राजा. मनसेने ठराव मांडण्यासाठी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे' असं संजय नार्वेकर यांनी म्हटलं आहे. तसेच माझ्यासारखे अनेक कलावंत जे आम्ही मध्यमवर्गीय स्तरातून आलो आहे. अशांना स्वस्त दरात, नियमाने परवडणारी घर मिळावीत म्हणून स्वतः राजसाहेबांनी पाठपुरावा केला. असा मराठी कलाकारांच्या पाठीशी ठाम उभा राहणारा हा नेता असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

संजय नार्वेकर यांनी 'छत्रपतींची स्मारके असलेल्या महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचे संवर्धन करून त्यांचा इतिहास जतन करणे गरजेचं आहे. हा विचार खरंच खूप मोठा आहे. पाश्चिमात्य देशात आपण जेव्हा कला सादर करायला जातो. तेव्हा काही वेळ मिळतो म्हणून आम्ही थोडंफार फिरतो. महाराष्ट्रातला टुमदार बंगला जो तिथे किल्ला म्हणून दाखवला जातो. त्याचा इतिहास फार काही नसतो, थोडाफार असतो. पण त्याचं नाट्यरुपांतर करून तो दाखवला जातो. त्याच्यापेक्षा खूप मोठा इतिहास आमच्या महाराष्ट्रात आहे' असं म्हटलं आहे. 

गडकिल्ले संवर्धन, नाट्यगृहांची दुरावस्था सुधारावी. प्रायोगिक रंगभूमी जोपासणं ती वृद्धिंगत करणं गरजेचं. मराठी चित्रीकरणासाठी एक खिडकी परवानगी कक्ष स्थापन व्हावा आणि मराठी चित्रपटांना हक्काचं स्थान मिळालाच पाहिजे. त्यासाठी आम्ही कार्यरत राहू असं देखील नार्वेकर यांनी सांगितलं आहे. मनसेच्या महाअधिवेशनात अमित ठाकरेंची मनसेच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. बाळा नांदगावकरांनी हा प्रस्ताव मांडला असून, त्याला इतरांनी अनुमोदन दिलं आहे. त्यानंतर अमित ठाकरेंनी मंचावर येत भाषणातून भावना व्यक्त केल्या आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

MNS Maha Adhiveshan Live: अमित ठाकरे यांचं राजकीय पदार्पण; मनसे नेतेपदी झाली निवड

मंत्र्यांवर वचक ठेवण्यासाठी मनसेची 'शॅडो कॅबिनेट'; काय आहे हा अमेरिका-इंग्लंडचा फॉर्म्युला? 

मनसेचा नवा झेंडा वादाच्या भोवऱ्यात; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मराठा संघटनांनी केली 'ही' मागणी

''मराठी भाषा, अस्मितेसाठी राज ठाकरेंनी 100हून अधिक केसेस अंगावर घेतल्या"

मनसे महाअधिवेशन : नवीन झेंडा घेऊ हाती...

 

टॅग्स :राज ठाकरेमनसेमुंबईसंजय नार्वेकरसिनेमागडअमित ठाकरे