Join us  

राज ठाकरेंच्या नादाला लागू नका; अन्यथा... मनसेचा थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 7:02 PM

इम्तियाज जलील यांच्या आम्ही अंगावर आलात तर शिंगावर घेऊ या विधानावरुन एकदा प्रयत्न तर करा असा इशारा देखील बाळा नांदगावकर यांनी दिला आहे.

मुंबई: मनसेच्या पहिल्या अधिवेशनात आमच्या आरत्यांचा त्रास लोकांना होत नाही मग नमाजचा त्रास लोकांना का? असा सवाल मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी उपस्थित केला होता. राज ठाकरेंच्या या विधानावरुन एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी गेले अनेक वर्ष राज ठाकरे राजकारणात होते. मात्र त्यांच्या कानाला आताच त्रास कसा काय होतो आहे असा सवाल उपस्थित करत राज ठाकरेंवर टीका केली होती. यावर आता राज ठाकरे यांच्या नादाला लागायचं नाही, आत्ताच सांगू ठेवतो असं म्हणत बाळा नांदगावकर यांनी एमआयएमचे नेते  इम्तियाज जलील यांना इशारा दिला आहे.

राज ठाकरे यांनी अधिवेशनाच्या भाषणात धर्म तुमच्या घरात आचरणात आणा. मशिदींवरचे भोंगे हवेत कशाला? आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो व त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का? तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नसल्याचे सांगितले होते. यावर इम्तियाज जलील यांनी गेले अनेक वर्ष राज ठाकरे राजकारणात होते. मात्र त्यांच्या कानाला आताच त्रास कसा काय होतो आहे असा सवाल इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला होता. 

'कानाला आता त्रास होतो आहे का?'; मशिदीवरील भोंगे हटविण्यावरुन राज ठाकरेंवर निशाणा

राज ठाकरे एन्टरटेनर असल्याचे सांगत आम्ही मनसेला घाबरत नाही, आजपर्यंत सगळ्यांनाच शिंगावर घेतलं आहे, त्यामुळे एमआयएम कुणालाही घाबरत नाही, असं इम्तियाज जलील यांनी केले होते. यावर एमआयएमच्या नेत्यांनी तोंड सांभाळून बोलावं. राज ठाकरेंबद्दल हिन दर्जाची टीका सहन केली जाणार नाही. पुन्हा हि आगळीक झाली तर मनसेदणका निश्चित असं म्हणत बाळा नांदगावकर यांनी एमआयएमला इशारा दिला आहे. 

राज ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर अमृता फडणवीस म्हणतात...

बाळा नांदगावकर यांनी व्हिडिओ शेअर करुन म्हणाले की, इम्तियाज जलील यांनी खासदारकीची लॉटरी लागली आहे. तसेच एन्टरटेनर कोणाला म्हणता असा सवाल उपस्थित करत राज ठाकरेंच्या नादी लागू नका, हवं असल्यास अबू आझमी यांना विचारा असं सांगत बाळा नांदगावकर यांनी एमआयएमच्या नेत्यांना इशारा दिला आहे. तसेच एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी औरंगबादला नाचले त्यांना आम्ही नाच्या बोलू का असा सवालही बाळा नांदगावकर यांनी इम्तियाज जलील यांनी विचारला आहे. त्याचप्रमाणे इम्तियाज जलील यांच्या आम्ही अंगावर आलात तर शिंगावर घेऊ या विधानावरुन एकदा प्रयत्न तर करा असा इशारा देखील बाळा नांदगावकर यांनी इम्तियाज जलील यांना दिला आहे.

देशाशी प्रामाणिक मुस्लिम आहेत ते आमचेच आहेत. एपीजे अब्दुल कलाम, झहीर खान, जावेद अख्तर ह्यांना नाकारता येणार नाही असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केले होते. तसेच धर्म तुमच्या घरात आचरणात आणा. मशिदींवरचे भोंगे हवेत कशाला? आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो व त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का? तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नसल्याचे सांगितले होते. तसेच समझौता एक्स्प्रेस बंद करण्याची मागणी देखील राज ठाकरेंनी यावेळी केली. देशात उभे राहिलेले मोहल्ल्यांचे उदाहरण देत उद्या जर युद्ध झाले तर सैन्याला बाहेरच्या नाही तर देशातल्या शत्रूंशीच लढावं लागेल असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले होते.

दरम्यान, अधिवेशनात पक्षाच्या बहुरंगी झेंड्याच्या जागी छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा असणारा ध्वजाचं अनावरण केलं. तसेच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात 'मराठी बांधवानो, भगिनींनो आणि मातांनो' अशी न करता 'माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनीनों आणि मातांनो' अशी साद घालू केली. त्यामुळे मनसे आगामी काळात हिंदुत्वाच्या मार्गानेच वाटचाल करणार असल्याचे राज ठाकरे यांनी गुरुवारी पक्षाच्या अधिवेशनात स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :राज ठाकरेमनसेबाळा नांदगावकरऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनमहाराष्ट्रइम्तियाज जलील