Join us

“प्रत्येक घरात एक तरी सैनिक व्हायला हवा”, मनसेचे बाळा नांदगावकर असं का म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 11:26 IST

मुलुंड पश्चिमेकडील सार्वजनिक शिक्षण संस्थेत कारगिल विजय दिवस शनिवारी साजरा करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पुढील पिढी देशाचे रक्षण करणारी सशक्त पिढी असेल. तसेच प्रत्येक घरात एक सैनिक असावा. यातून भारताची ताकद वाढेल, असे मत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केले.

मुलुंड पश्चिमेकडील सार्वजनिक शिक्षण संस्थेत कारगिल विजय दिवस शनिवारी साजरा करण्यात आला. त्यावेळी नांदगावकर बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर उपस्थित होत्या, तर अध्यक्षस्थानी डॉ. विवेक देशपांडे होते. यावेळी संस्थेचे विश्वस्त आणि नाइट कॉलेज ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अॅड. वसंतराव देशपांडे, संस्थेचे सचिव डॉ. काशीनाथ जोशी, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. किशोर डांगे उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विवेक देशपांडे यांनी अध्यक्षीय भाषणात संस्थेत राबविण्यात येणाऱ्या नवनवीन उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमात अमर जवानांचा पुष्पचक्र अर्पण करून सन्मान करण्यात आला. देशभक्ती गीत, नृत्य आणि पिरॅमिडस विद्यार्थ्यांनी सादर केले. यावेळी कारगिल युद्धावर आधारित माहितीपट दाखवण्यात आला.

टॅग्स :बाळा नांदगावकरमनसेमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाकारगिल विजय दिन