mns leader amey khopkar appeals shiv sainiks to join mns on twitter | "बाळासाहेबांच्या कडव्या शिवसैनिकांनो..., मनसेचा झेंडा हाती घ्यायची हीच ती वेळ"
"बाळासाहेबांच्या कडव्या शिवसैनिकांनो..., मनसेचा झेंडा हाती घ्यायची हीच ती वेळ"

मुंबई : राज्यातील बदलेली राजकीय परिस्थिती पाहता, महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) देखील नव्या भूमिकेत समोर येण्यास सज्ज झाला आहे. मनसेचे राज्यस्तरीय अधिवेशन  23 जानेवारीला होणार आहे. या अधिवेशनात मनसेची नव्या झेंड्यासह पुढील वाटचाल ठरवली जाणार आहे. 

या पार्श्वमीवर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी बाळासाहेबांच्या कडव्या शिवसैनिकांनो निराश होऊ नका. मनसेचा झेंडा हाती घ्या, असे आवाहन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना केले आहे. तसेच, महाविकास आघाडीला 'सपक महाखिचडी'ची उपमा अमेय खोपकर यांनी दिली आहे. 

अमेय खोपकर यांनी याबाबत ट्विट केले आहे. ते म्हणाले, "पोषक आहारासाठी राब राब राबलेल्या कार्यकर्त्यांच्या वाट्याला आली सपक महाखिचडी..पण सच्च्या कार्यकर्त्यांनो, बाळासाहेबांच्या कडव्या शिवसैनिकांनो निराश होऊ नका. निर्लज्जपणे असाच सुरु राहील सत्तेचा खेळ. मनसेचा झेंडा हाती घ्यायची हीच ती वेळ. बाळासाहेबांच्या जयंतीला 'मन से' सामील व्हा".

दरम्यान, राज्याच्या राजकारणात गेल्या दोन महिन्यापासून मोठ्या प्रमाणात उलथापालथ होताना दिसत असताना मनसेदेखील नव्या रुपात लोकांसमोर येणार आहे. मनसेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन उद्या मुंबईत पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर मनसेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. याच अधिवेशनात मनसे हिंदुत्वाच्या दिशेने वाटचाल करणार असल्याचे बोलले जात आहे. 

Web Title: mns leader amey khopkar appeals shiv sainiks to join mns on twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.